एक्स्प्लोर

भिवंडीत ट्रक चालकाचा दगडाने ठेचून खून, गुन्हेगार एका शब्दामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

भिवंडीत चोरीच्या उद्देशाने एका ट्रकचालकाची हत्या झाली होती. लुटमारी करताना या गुन्हेगाराने "हम गांववाले है' असं बोलून वाद घेतला. या एकाच शब्दामुळे पोलिसांनी त्याला शोधून काढलं.

भिवंडी : मोबाईल आणि पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने कंटेनर (ट्रक) चालकाचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे. विशेष म्हणजे खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही पुरावा घटनस्थळी सोडला नव्हता. मात्र लुटमारी करताना या गुन्हेगाराने "हम गांववाले है' असं बोलून वाद घेतला. या एकाच शब्दामुळे पोलिसांनी त्याला शोधून काढलं. तसंच त्याच्यासह 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलं आहे. किरण नथ्थु पाटील (वय 27 वर्षे) असं या गुन्हेगाराचं नाव आहे. तर आझम शाबल अन्सारी (वय 28 वर्ष) असं खून झालेल्या ट्रक चालकाचं नाव असून तो मुंबईचा रहिवासी होता.  

भिवंडीतील राजलक्ष्मी कंपाऊंड काल्हेर इथे नवी मुंबईतून आझम शाबल अन्सारी कंटेनर घेऊन माल घेण्यासाठी येऊन उभा राहिला. मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनरमध्ये झोपला असता त्या ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या दोन आरोपी कंटेनरच्या केबिनमध्ये लुटीमरीच्याच्या उद्देशाने घुसले. त्यांनी आझम शाबल अन्सारीसोबत वाद घातला. "आम्ही गाववाले आहोत, आम्ही कुठेही फिरणार, तू कोण विचारणारा?" असा दम देखील आरोपींनी कंटेनर चालकाला दिला होता. दम दिल्यानंतर दोन्ही आरोपी निघून गेले, मात्र काही वेळाने पुन्हा तिथे येऊन रागाच्या भरात त्यांनी चालकाच्या डोक्यात दगड मारुन हत्या केली होती.

या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याचा समांतर तपास करणाऱ्या भिवंडी गुन्हे शाखा करत करत होती. गुन्ह्याबाबत कोणताही पुरावा नसताना तक्रारदार सत्यप्रकाश सदाशिव मिश्रा यांनी सांगितलं की, "आरोपी बोलले की आम्ही गाववाले आहोत." या संभाषणावर लक्ष केंद्रीत करत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली  धागा पकडून गुन्हे पार्श्वभूमी असलेल्यांची माहिती घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नथ्थू पाटील याला मिठपाडा इथे सापळा रचून ताब्यात घेतलं. त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. त्यांच्याकडे आढळलेल्या तीन मोबाईलची चौकशी केली. हा फोन 10 जून रोजी एक गोदामात झोपलेल्या कामगाराचा असल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर हत्येसह मोबाईल चोरी असे दोन्ही गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. 

आरोपी किरण पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी चोरी घरफोडी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. कोणताही पुरावा नसताना गुन्हे शाखेने संभाषणाचा धागा पकडून हत्येच्या गुन्ह्याची उकल केल्याने गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vare Nivadnukiche : निवडणुकीची प्रत्येक बातमी एका क्लिकवर : 29 March 2024Girish Mahajan : विजयसिंह मोहिते पाटलांच्या मनधरणीचे भाजपचे प्रयत्नCM Eknath Shinde  : मुख्यमंत्र्यांची वाट बघून हेमंत गोडसे नाशिकला परतलेABP Majha Headlines : 8 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Embed widget