Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Amit Thackeray Sada Sarvankar Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काल सदा सरवणकर यांची प्रचारफेरी दादरमधील शिवसेना भवन कार्यालयाच्या समोरुन गेली.
Sada Sarvankar Mahim Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आतापर्यंत मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ (Mahim Vidhan Sabha) कायम चर्चेत आहे. कारण माहीममधून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray) , शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे, महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्याकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. काल सदा सरवणकर यांची प्रचारफेरी दादरमधील शिवसेना भवन कार्यालयाच्या समोरुन गेली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील सहभागी झाले होते. सदा सरवणकर यांची शिवसेना भवन येथे प्रचारफेरी आल्यानंतर सदा सरवणकर आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
शिवसेना आणि महायुतीचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ आज दादर - प्रभादेवी - माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत आवर्जून सहभागी झालो. यावेळी नागरिकांनी दर्शविलेली उपस्थिती आणि रॅलीत होणार शिवसेनेचा जयघोष हा सदा सरवणकर यांच्या विजयाची शाश्वती देणारा होता, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना आणि महायुतीचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ आज दादर - प्रभादेवी - माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत आवर्जून सहभागी झालो. यावेळी नागरिकांनी दर्शविलेली उपस्थिती आणि रॅलीत होणार शिवसेनेचा जयघोष हा श्री. सदा सरवणकर… pic.twitter.com/rUUKj7Uihf
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) November 7, 2024
...अन् सदा सरवणकरांनी निर्णय मागे घेतला-
एबीपी माझाच्याच कार्यक्रमात राज ठाकरे पक्ष आणि चिन्हावरून जे बोलले ते देखील शिवसेनेच्या नेत्यांना रुचले नाही, त्यामुळे सर्व ठरले असताना, सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. अर्ज मागे घेण्याच्या आधी समोरासमोर बसून चर्चा व्हावी, असे मत शिवसेना नेत्यांचे होते मात्र सरवणकर यांना भेट नाकारल्याने शिवसेनेने अमित ठाकरेंच्या विरोधात लढणार नसल्याचा जो निर्णय घेतला होता तो मागे घेतला.