एक्स्प्लोर
बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन लांबणीवर
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबई महापालिकेतील तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी त्यांचा पूर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बसवण्यात यावा, अशी मागणी केली होती.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन लांबणीवर पडलं आहे. जागा बदलामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी पुतळ्याचे उद्घाटन अशक्य असल्याचं कळतं. बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या जागा बदलाबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आलेला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबई महापालिकेतील तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी त्यांचा पूर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बसवण्यात यावा, अशी मागणी केली होती.
मात्र आता हा पुतळा महात्मा गांधी रोड, चौकातील वाहतूक बेटामध्ये बसवण्याची मागणी शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे. रिगल थिएटरजवळील जागा छोटी असल्याने मोठ्या जागेत हा पुतळा उभारला जावा म्हणून जागेत बदल करण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. पुतळ्याची जागा बदलल्याने पुन्हा नव्याने परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. यामुळे बाळासाहेबांच्या जयंती दिनी या पुतळ्याचे उद्घाटन होणं अशक्य झालं आहे.
यशोधर फडणसे यांच्या मागणीनुसार महापालिकेने पाठपुरावा केल्यावर तब्बल चार वर्षांनी पुरातत्व कमिटीने पुतळा उभारण्यास मंजुरी दिली. मुंबई अर्बन आर्टस् कमिशन यांच्याकडून अद्याप पुतळा बसवण्यासाठी होकार आलेला नाही. पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने सदर प्रस्ताव राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्याने पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाची परवानगी मिळणार होती. त्यामुळे येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीदिनी पुतळ्याचे उद्घाटन होईल असे सांगण्यात येत होते. परंतु जागा बदलामुळे उद्घाटन लांबणीवर पडलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती ब्रांझचा पुतळा नऊ फूट उंचीचा असेल. कलानगर येथील सुप्रसिद्ध शिल्पकार शशिकांत वडके यांनी पुतळा साकारला आहे. शिवतीर्थावरील सभेला आल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळासाहेबांचे असलेले भाव या पुतळ्याच्या चेहऱ्यावर असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement