एक्स्प्लोर
ठाण्यातील घोडबंदर रोडवरुन युरेनियम सदृश्य पदार्थाचा साठा जप्त
मुंबई: ठाणे पोलिसांनी एका कारवाईदरम्यान युरेनियम सदृश्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची किंमत तब्बल 24 कोटींच्या घरात असल्याचं समजतं आहे.
जप्त करण्यात आलेल्या पदार्थामध्ये युरेनियमचं प्रमाण 80 ते 87 टक्क्यादरम्यान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर दोन इसम युरेनियमसदृश पदार्थ घेऊन येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्या माहित्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली.
या कारवाईत दोन्ही इसमांकडून एका हॅन्डबँगमधून कार्बन पेपरस व निळ्या रंगाच्या कापडात गुंडाळलेल्या युरोनियम सदृश्य पदार्थ हस्तगत करण्यात आला. प्रयोगशाळेत याची तपासणी केली असता. या पदार्थामध्ये 87.70 टक्के युरोमनियम असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र डोईफोडे करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement