एक्स्प्लोर
महिलेला 'छम्मकछल्लो' म्हणणाऱ्या ठाण्यातील व्यक्तीला जेल!
या शब्दामुळे संतापलेली महिला तक्रार दाखल करण्यासाठी सुरुवातीला हौसिंग सोसायटीमध्ये गेली, पण तिथे दखल न घेतल्याने ती पोलिस स्टेशनमध्ये गेली.

ठाणे : हिंदी भाषेतील 'छम्मकछल्लो' ह्या शब्दाचा बॉलिवूडच्या गाण्यातील वापर तुम्हाला आवडू शकतो, पण खऱ्या आयुष्यात या शब्दाचा उपयोग केल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता. 'छम्मकछल्लो' या शब्दाचा वापर एखाद्या महिलेचा अपमान केल्यासारखं असल्याचा निकाल ठाण्याच्या कोर्टाने दिला आहे. या शब्दामुळे त्यांना चीड आणि राग येतो, असं कोर्टाने म्हटलं आहे. 'छ्म्मकछल्लो' शब्दामुळे महिलांना चीड न्यायदंडाधिका आर टी इंगळे यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे की, "हा एक हिंदी शब्द आहे. इंग्लिशमध्ये असा शब्द नाही. भारतीय समाजात अशा शब्दांचा अर्थ त्याच्या वापरानुसार समजला जातो. सामान्यत: त्याचा उपयोग महिलेचा अपमान करण्यासाठी केला जातो. महिलेचं कौतुक करण्यासाठी हा शब्द नाही. यामुळे महिलांना चीड येते, राग येतो." काय आहे संपूर्ण प्रकरण? 9 जानेवारी 2009 रोजीचं हे प्रकरण आहे. घोडबंदर रोड परिसरातील ही महिला सकाळी 9.14 वाजता पतीसह मॉर्निंग वॉक करुन घरी परतत होती. यावेळी फ्लॅटवर जाताना तिचा धक्का लागल्याने आरोपीचा कचऱ्याचा डब्बा पडला. महिलेने जाणीवपूर्वक डब्ब्याला धक्का दिला असं वाटल्याने तो तिच्यावर ओरडला. आरोपी आणि दाम्पत्यामध्ये जोरदार वाद झाला. बाचाबाचीदरम्यान आरोपीने महिलेला 'छम्मकछल्लो' संबोधलं. पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही या शब्दामुळे संतापलेली महिला तक्रार दाखल करण्यासाठी सुरुवातीला हौसिंग सोसायटीमध्ये गेली, पण तिथे दखल न घेतल्याने ती पोलिस स्टेशनमध्ये गेली. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. म्हणून महिलेने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. आठ वर्षांनी शिक्षा न्यायदंडाधिकारी आर टी इंगळे यांनी आठ वर्षांनंतर हे प्रकरण योग्य असल्याचं सांगत आरोपीने भारतीय दंड विधान कलम 509 (शब्द, इशारे आणि वर्तणुकीमुळे महिलेचा अपमान) अंतर्गत गुन्हा केल्याचं नमूद केलं. कोर्टाने या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवत त्याला केवळ एक रुपयाचा दंड ठोठावला आणि कोर्टाचं दिवसभराचं कामकाज होईपर्यंत कोठडी सुनावली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























