एक्स्प्लोर
मुंबईच्या वेशीवर पुन्हा शेतकरी मोर्चा धडकला
सुकाणू शेतकरी मोर्चामध्ये 13 शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी मुंबईत आल्या आहेत. भाजप सरकारकडून या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही असे शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुंबई : मुंबईच्या वेशीवर हजारोच्या संख्येने पुन्हा शेतकरी मोर्चा धडकला आहे. या सुकाणू शेतकरी मोर्चामध्ये 13 शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी मुंबईत आल्या आहेत. भाजप सरकारकडून या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही असे शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नुकताच मुंबईच्या आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आदिवासी, शेतकऱ्यांनी 'उलगुलान मोर्चा' काढला होता. राज्यसरकारने त्याची दखल घेत पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचं लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं.
दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारत लाँगमार्च काढला होता. या मोर्चात आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरीही सहभागी झाले होते. हजारोच्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाल्याने विधानसभेतही याचे पडसाद उमटले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाची दखल घेत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केलं. आता पुन्हा हजारोच्या संख्येने शेतकरी मोर्चा मुंबईच्या वेशीवर आला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना मुंबईच्या वेशीवरच रोखले आहे. आता काय निर्णय होणार याची मोर्चेकरी वाट पाहत आहेत. शेतकरी सुकाणू समितीच्या विविध मागण्यांसाठी ठाण्याच्या आनंदनगर चेक नाका येथे हजारो मोर्चेकरी आले आहेत. काय आहेत सुकाणू शेतकरी मोर्चाच्या मागण्या - वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा - गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा - सर्व शेतकऱ्यांची कर्ज व वीज बिलातून मुक्तता करा - राष्ट्रीय आपत्ती कायद्यात दुष्काळाचा समावेश करा - गावात रोजगार पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करा - आदिवासी वनहक्क कायद्याची अमलबजावणी करून वनहक्क दावेदारांना कसलेल्या जमिनीचा सात बारा द्या - सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवा - शेतकरी विरोधी कायदे रद्द करा - दोन कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाका - शेतमालाला भाव न देणाऱ्या साखर कारखान्यांना बाजार समित्या व दूध संस्थानांवर कडक कारवाई कराअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
