एक्स्प्लोर
कुटुंबाचा प्रेमाला विरोध, अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
नालासोपारा: नालासोपारात अल्पवयीन प्रेमीयुगलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकरावर वसई-विरार पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मुलगी नववीत शिकणारी अवघी १५ वर्षाची होती. तर मुलगा अकरावीत शिकणारा आहे.
मुलीच्या आईने प्रेमाला विरोध केल्याने या अल्पवयीन मुलांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला आहे. तर अकरावीत शिकणारा १९ वर्षाचा प्रियकर सुदैवान वाचला आहे.
काल सकाळापासून मुलगी अचानक गायब झाली होती. तिचा शोध घेण्याचा पालकांनी प्रयत्न केला. त्यावेळी मुलाच्या घरात दोघेजण विष प्यायलेल्या अवस्थेथ आढळून आले. मुलीच्या घरच्यांनी दोघांना तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात भरती केलं. मात्र मुलीला मृत घोषित करण्यात आलं तर तरुण सुदैवाने वाचला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement