एक्स्प्लोर
मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईच्या माटुंगा परिसरातील डेढिया इस्टेट नावाची तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुषांचा समावेश असून एकाचं वय 45 वर्ष तर दुसऱ्याचं वय 60 वर्ष होतं. दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा हटवला. जवानांनी ढिगाऱ्याखाली दोन मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. पोलिस आणि अग्निशमन दलाचं पथक स्लॅब दुर्घटनेची चौकशी करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
नाशिक























