एक्स्प्लोर
मुंबईच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करा, शिवसेना आक्रमक
मुंबई : एबीपी माझाने मुंबईच्या सुरक्षेचं वास्तव दाखवल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. जकात नाक्यावरील ग्राऊंड रिपोर्टनंतर शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी गृह सचिवांकडे धाव घेत मुंबईच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी गृह सचिव सुधीर श्रीवास्तव यांची भेट घेतली. जकात नाके बंद झाल्यापासून मुंबईच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुक्षेच्या इतर उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी निलम गोऱ्हे यांनी केली.
देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारावरील जकात नाके बंद झाले आहेत. त्यामुळे शहरात प्रवेश करताना कोणतीही तपासणी केली जात नाही. एबीपी माझाने मुंबईतील जकात नाक्यांवरील सुरक्षेचा ग्राऊंड रिपोर्ट दाखवल्यानंतर निलम गोऱ्हे यांनी मुंबईच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
व्हिडिओ : मुंबईतील जकात नाक्यावरचा 'माझा'चा ग्राऊंट रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement