एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना वि भाजप संघर्ष रस्त्यांवर, मुंबईत शिवसैनिकांकडून आशिष शेलार यांचं होर्डिंग
मुंबईत शिवसैनिकांनी भाजप आमदार आशिष शेलार यांचे वादग्रस्त होर्डिंग लावले आहेत. भाजप प्रदेश कार्यालय आणि भाजप नेते राज पुरोहित यांच्या कार्यालयासमोर आशिष शेलार यांचे होर्डिंग लावण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईत शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर आमदार आशिष शेलार यांचे वादग्रस्त होर्डिंग लावले. नालासोपाऱ्यातील कार्यक्रमात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर हे होर्डिंग लावण्यात आले. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रस्त्यांवरही दिसू लागला आहे.
शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालय आणि पक्षाचे नेते राज पुरोहित यांच्या कार्यालयासमोर आशिष शेलार यांचे होर्डिंग लागले. या होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्नं अवस्थेत दाखवण्यात आले आहेत. तसेच "आ'शिषे' मे देख आणि राजकारणातील हि.. जाडा," असा मजकूर लिहिण्यात आला आहे. दरम्यान, सध्या हे होर्डिंग हटवण्यात आले आहेत.
तुझ्या बापाचं राज्य आहे का? सीएएवरुन आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
काय म्हणाले होते आशिष शेलार?
नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर "अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का," असं म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषा वापरली होती. तसंच शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडा ही आत्महत्या करेल, असंही ते म्हणाले होते.
आशिष शेलार यांच्या या टिप्पणीवर शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही टीका केली होती. त्यानंतर आपल्याला दिलगिरी व्यक्त करण्यात कमीपणा वाटत नाही, असं आशिष शेलार म्हणाले होते. परंतु त्यानंतरही हा संघर्ष कायम असल्याचं दिसत आहे. शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून शेलार यांच्यावर टीकेचे बाण सुरुच ठेवले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement