एक्स्प्लोर

तुझ्या बापाचं राज्य आहे का? सीएएवरुन आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

कोणाला वाईट वाटत असेल तर आम्हाला दिलगिरी व्यक्त करण्यास कमीपणा वाटत नाही. मात्र संविधानिकरित्या बनवलेल्या कायद्याला विरोध करणे, संविधानिक आहे का? असं स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं.

वसई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू देणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे. "अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का," असं म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषा वापरली आहे. तसंच शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेचाही समाचार घेतला. शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडा ही आत्महत्या करेल, असं ते म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपारा इथे रविवारी (2 फेब्रुवारी) एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलं. अरे तुझ्या बापाचं राज्य आहे काय? : आशिष शेलार शिवसेनेने बदललेले रंग एवढे आहेत की, सरड्यानेही आत्महत्या करावी. म्हणून सीएए महाराष्ट्रात लागू देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे काय? हा केंद्राचा कायदा आहे. अॅडव्होकेट जनरलचं मत घ्या. माहित नसेल तर अभ्यास करा. नसेल करता येत तर माझ्यासारखे वकील खूप आहेत. पण हा कायदा लागूच करता येणार नाही, ही भूमिकाच मांडता येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या माध्यामातून मोठा कट : आशिष शेलार आशिष शेलार म्हणाले की, सीएए आणि एनआरसीविरोधात मुस्लीम समाजाच्या तरुण विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी (नाव न घेता) एक युवा नेता गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनात सहभागी झाला होता, त्यावेळी सरकारविरोधी तर ठीक आहे पण देशाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. त्याच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते त्याठिकाणी भेटून आंदोलनाला पाठिंबा देऊन गेले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोण? गृहमंत्री कोणाचे? असे असतानाही राज्यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठा कट रचला जात आहे. हा कट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजूबाजूला फिरत आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेप दरम्यान आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. आशिष शेलार यांना असं वक्तव्य करणं शोभत नाही, असं आव्हाड म्हणाले. "मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानणं आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही," अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे. दिलगिरी व्यक्त करायला कमीपणा वाटत नाही : आशिष शेलार "कोणाचाही अपमान करणे आमची संस्कृती नाही. कोणाला वाईट वाटत असेल तर आम्हाला दिलगिरी व्यक्त करण्यास कमीपणा वाटत नाही. संविधानाबद्दल आम्हाला शिकवू नका. असंविधानिक भाषा वापरल्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त करायला काही वाटत नाही. मात्र संविधानिकरित्या बनवलेल्या कायद्याला विरोध करणे, संविधानिक आहे का?" असं स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील तीन तासांत पाऊस पडणार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील तीन तासांत पाऊस पडणार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
Petrol Diesel CNG price Hike: पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका बसणार, दिल्लीत निर्णय झाला, मुंबईतही सीएनजीचे दर वाढणार?
पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका बसणार, दिल्लीत निर्णय झाला, मुंबईतही सीएनजीचे दर वाढणार?
Nanded News : डॉक्टर होण्याचं स्वप्न...पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ; दीड महिन्यांपासून बेपत्ता विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी!
डॉक्टर होण्याचं स्वप्न...पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ; दीड महिन्यांपासून बेपत्ता विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी!
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
Crime News: नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
Petrol Diesel Shortage : महाराष्ट्रात इंधन टंचाई, विदर्भ, मराठवाड्यात डिझेलसाठी रात्रभर शेतकऱ्यांच्या रांगा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली, ट्रॅक्टरवरतीच जागून काढली रात्र
महाराष्ट्रात इंधन टंचाई, विदर्भ, मराठवाड्यात डिझेलसाठी रात्रभर शेतकऱ्यांच्या रांगा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली, ट्रॅक्टरवरतीच जागून काढली रात्र
Nagpur Crime : उपराजधानी नागपुरात कायद्याचे तीन तेरा, 48 तासात तीन भयावह घटनांचा थरार; गृहमंत्र्याचा गृहजिल्हा हादरला!
उपराजधानी नागपुरात कायद्याचे तीन तेरा, 48 तासात तीन भयावह घटनांचा थरार; गृहमंत्र्याचा गृहजिल्हा हादरला!
Aishwarya Rai Cannes 2026: ‘क्वीन इज बॅक!’ कान्समध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस अवतार पाहून साऱ्यांच्याच नजरा खिळल्या; PHOTOs पाहिलेत?
‘क्वीन इज बॅक!’ कान्समध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस अवतार पाहून साऱ्यांच्याच नजरा खिळल्या; PHOTOs पाहिलेत?
Petrol Diesel CNG price Hike: पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका बसणार, दिल्लीत निर्णय झाला, मुंबईतही सीएनजीचे दर वाढणार?
पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका बसणार, दिल्लीत निर्णय झाला, मुंबईतही सीएनजीचे दर वाढणार?
Embed widget