एक्स्प्लोर
शिवसेनेची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, सेनेचे महत्वाचे नेते हजर
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. सध्या बैठक सुरु असून या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि गजानन कीर्तिकर हे उपस्थित आहेत.
मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा बसणार यावरुन सध्या बरंच राजकारण तापलं आहे. भाजप आणि शिवसेनेला कोण साथ देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, काल मनसेनं आपल्यासाठी सगळे पर्याय खुले असल्याचं वक्तव्य केल्यानं शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आज ही तातडीची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समजते आहे.
दरम्यान, काल ‘वर्षा’ बंगल्यावर भाजपच्याही कोअर कमिटीची बैठक पार पाडली. मुंबईत महापौर बसावा यासाठी भाजपही जोरदार प्रयत्न करत असून त्यासाठी ते सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संपर्कात आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील मुंबईत सर्व आमदारांची बैठक बोलावली असून शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेकडेही शिवसेना-भाजपचं लक्ष असणार आहे. तसेच काँग्रेसनंही महापौरपदासाठी आपला उमेदवार उभा केल्यानं राष्ट्रवादीनं काँग्रेसला मत द्यावं अशी भूमिका घेतली आहे.
संबंधित बातम्या:
महापौर निवडणुकीत मनसे, MIM भाजपला पाठिंबा देणार?
शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची 'वर्षा'वर खलबतं
शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं
मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !
कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना
..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?
महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..
उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र…
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement