संजय दत्तला अमेरिकेचा व्हिजा मिळणं अवघड; उपचारासाठी जाऊ शकतो सिंगापूरला
मुंबई बॉम्बस्फोटात आरोपी असल्यामुळे संजय दत्तला उपचारासाठी अमेरिकेला जाण्यासाठी व्हिजा मिळणं अवघड आहे. त्यामुळे तो सिंगापूरला उपचारासाठी जाऊ शकतो.
मुंबई : बॉलिवुडचे सुपर स्टार अभिनेता संजय दत्तला उर्फ संजय बाबा यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण इंडसट्री आणि संजू बाबाच्या फैनसमध्ये चिंता आणि दुःख व्यक्त केलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दत्त यांना स्टेज 4 चा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. दत्तच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. चाचणीनंतर कर्करोगाचा निदान झालं. दत्त परदेशात उपचारासाठी जाण्याच्या तयारीत होते. पण एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त अमेरिकेच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाण्याच्या तयारीत आहेत, परंतु संजय दत्तकडे अमेरिकेचा व्हिसा नसल्याच कळतय आणि मुंबई बॉम्बस्फोटात आर्मस अॅक्टमध्ये दोषी ठरवल्या गेल्यामुळे त्यांना अमेरिकेचा व्हिजा मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते.
अशा परिस्थितीत संजय दत्तला मेडिकल ग्राऊंडवर अमेरिकेचा व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. परंतु अमेरिकेच्या कठोर कायद्यांमुळे, जर त्यांना अमेरिकेत उपचार घेण्याची परवानगी नसेल तर ते उपचारांसाठी सिंगापूरलाही जाऊ शकतात, जे या शिवाय लंडन त्यांच्यासाठी आणखी एक पर्याय असेल, असं ही सांगितलं जातय. पण यूके व्हिजाचे कायदे ही खूप कडक आहेत.
पाहा व्हिडीओ : अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर
उल्लेखनीय आहे की, त्याची आई नर्गिस दत्त यांच्यावरही 1980 मध्ये कर्करोगासाठी प्रसिद्ध असलेल्या त्याच रुग्णालयात कर्करोगाचा उपचार झाला होता. परंतु 1981 मध्ये त्यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा यांनादेखील कॅन्सर झाला होता आणि संजय दत्तशी लग्नानंतर दोन वर्षांनी 1987 मध्ये रिचा कर्करोगाने मरण पावली.
फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत पोहोचल्याची बातमी संजय दत्तला होताच, त्यांची पत्नी मान्यता दत्त आपल्या दोन मुलांसह थेट दुबईहून एका खास विमानातून मुंबईला पोहचल्या. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन आणि वाढत्या संकटामुळे ती मार्चपासून दुबईमध्ये अडकली होती, परंतु कर्करोगाच्या बातमीने संजय दत्त भयभीत झाला, मान्यता दत्त त्वरित आपल्या दोन मुलं इक्रा आणि शहरान मुंबईत परतली.
महत्त्वाच्या बातम्या :