एक्स्प्लोर
शिवसेनेच्या रवींद्र वायकरांचं आरे कॉलनीत अनधिकृत बांधकाम : निरुपम

मुंबई : गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आरे कॉलनीतील अनधिकृत जागेवर बांधकाम केलं आहे, असा आरोप मुंबई काँग्रसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रवींद्र वायकर यांनी व्यायाम शाळेच्या नावावर 20 एकर जमीन हडप केली आहे. वायकरांनी म्हाडाच्या जागेवर हे अतिक्रमण केलं आहे. म्हाडाने नोटीस देऊनही वायकर यांनी अतिक्रमण हटवलं नाही. एवढंच नाही तर महापालिकेने हे बांधकाम तोडण्याची नोटीस देऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही संजय निरुपम यांनी केला आहे. ज्या संस्थेला ही जमीन दिली ती रजिस्टर नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही संजय निरुपम यांनी केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
अहमदनगर























