एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रामनाथ कोविंद यांचा उद्धव ठाकरेंना फोन
एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. मुंबई दौऱ्यावर असलेल्या कोविंदा यांनी पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव यांचे आभार मानले.
मुंबई: एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. मुंबई दौऱ्यावर असलेल्या कोविंदा यांनी पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव यांचे आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंशी फोनवरुन बातचित केली.
रामनाथ कोविंद यांचं मुंबईत जंगी स्वागत
दरम्यान आज सकाळी रामनाथ कोविंद मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर कोविंद यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
कोविंद यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित होते.
यानंतर रामनाथ कोविंद मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये दाखल झाले. इथे त्यांनी घटक पक्षांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे आमदारही उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गिते, रामदास आठवले, राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाजप आणि घटकपक्षांचे नेते उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement