एक्स्प्लोर
पालघरमधील आदिवासी पाड्यावर राज ठाकरेंचं भोजन
पालघर दौऱ्यात आदिवासी पाड्यात जाऊन मनसैनिक रवी जाधव यांच्या घरी राज ठाकरेंनी जेवण घेतलं.

पालघर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघरमध्ये आदिवासी पाड्यावर जाऊन जेवण घेतलं. मनसैनिकाच्या घरी जमिनीवर बसून राज यांनी भोजनाचा आनंद घेतला. राज ठाकरे यांनी ट्वीट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी आपला दौरा सुरु केला आहे. पालघरमध्ये असताना आदिवासी पाड्यात जाऊन मनसैनिक रवी जाधव यांच्या घरी राज ठाकरेंनी जेवण घेतलं. त्यांच्या शेजारी मनसे नेते बाळा नांदगावकरही जेवताना दिसत आहेत. राज ठाकरेंनी नुकतीच ट्विटरवर एन्ट्री घेतली आहे, त्यामुळे लगेचच त्यांनी या सहभोजनाचा फोटो ट्वीट केला. सोशल मीडियावर सध्या या फोटोची चर्चा रंगली आहे. 'पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुंतल गावात माझा महाराष्ट्र सैनिक रवी जाधव यांच्या घरी जेवायला गेलो होतो. रवी हे मनसेचे वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य आहेत' अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे. रवी यांच्या घरातील भिंतीवर राज ठाकरेंचं पोस्टरही आहे.
यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही दलित बांधव किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जेवण केलं आहे.आज दुपारी पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील माझा महाराष्ट्र सैनिक, वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवायला गेलो होतो. pic.twitter.com/Z1LkdMYpG6
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2018
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत
बॉलीवूड























