ठाणे -कळवा रेल्वे स्थानकात आंदोलन; एसी लोकल रोखली, प्रवाशांना हटवत रेल्वे पोलिसांकडून लोकल वाहतूक पूर्ववत
Mumbai Local News : ठाणे - कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचं आंदोलन. प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली.
Mumbai Local News : ठाणे (Thane) -कळवा (Kalwa) रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन केलं आहे. संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल (AC Train) रोखली होती. रेल्वे पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत, प्रवाशांना हटवलं आणि लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली. एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्यानं प्रवासी आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे.
कळवा कारशेड इथून ज्या लोकल निघतात आणि पुढे ठाणे ते सीएसएमटी जातात. त्यात कळव्यातील अनेक प्रवासी बसून पुढे येतात, मात्र आता यापैकी एक लोकल, एसी लोकल म्हणून धावणार आहे. त्यामुळे कळव्यातील प्रवाशांना त्यात चढता आलं नाही, पाचवा सहावा ट्रॅक करून देखील कळवा इथून लोकल सुटत नाही की, फास्ट लोकल थांबत नाही. त्यामुळे ठाणे प्रमाणे कळवा इथून देखील लोकल सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
कळवा इथे प्रवाशांनी काही काळासाठी आंदोलन केलं. प्रवासी एवढे आक्रमक झाले होते की, त्यांनी काही काळासाठी एसी लोकल रोखून धरली होती. शेवटी आरपीएफ आणि जीआरपी यांना बळाचा वापर करून गर्दी बाजूला करावी लागली. त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत झाली. याचं कारण म्हणजे, कळवा कारशेड इथून ज्या लोकल निघतात आणि पुढे ठाणे ते सीएसएमटी जातात. त्यात कळव्यातील अनेक प्रवासी बसून पुढे येतात, मात्र आता यापैकी एक लोकल, एसी लोकल म्हणून धावणार आहे. त्यामुळे कळव्यातील प्रवाशांना त्यात चढता आलं नाही, पाचवा सहावा ट्रॅक करून देखील कळवा इथून लोकल सुटत नाही की, फास्ट लोकल थांबत नाही. त्यामुळे ठाणे प्रमाणे कळवा इथून देखील लोकल सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. यासाठी आधी देखील आंदोलनं झाली, मात्र आज एसी लोकल बघून प्रवासी संतापले. त्यांनी एसी लोकल बाहेर पडू दिली नाही, शेवटी जबरदस्ती सर्वांना बाजूला करून एसी लोकल रवाना करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :