Electric Double Decker Bus : कशी आहे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस?
Electric Double Decker Bus : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण करण्यात आलं. ही बस डिसेंबर ते जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. जाणून घेऊया कशी आहे इलेक्ट्रिक डबल डेकर बस?
Mumbai Electric Double Decker Bus : भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बस (Electric Double Decker Bus) लोकार्पण सोहळा आज (18 ऑगस्ट) मुंबईत (Mumbai) पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक डबल डेकर बस लॉन्च करण्यात आली. पूर्णपणे अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली आणि प्रदूषण पूर्णपणे कमी करणारी ही बस डिसेंबर ते जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सेवेत बेस्टकडून सुरु करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने 200 इलेक्ट्रिक डबल डेकर बस या बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. याआधी मुंबईत इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होत असताना आता डबल डेकर बसचं गिफ्ट मुंबईकरांना या निमित्ताने मिळालं आहे. बेस्ट बस ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन समजली जाते.
इलेक्ट्रिक बस हे प्रदूषणमुक्त देशासाठी महत्त्वाचं पाऊल : नितीन गडकरी
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते. लोकार्पणच्या वेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "आज इलेक्ट्रिक डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात येत असल्याने मी आनंदित आहे. प्रदूषणमुक्त देशासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. एकूण प्रदूषणापैकी 35 टक्के प्रदूषण हे पेट्रोल आणि डिझेलमुळे होत आहे." "इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणात घट होईल," असंही त्यांनी सांगितलं.
कशी आहे इलेक्ट्रिक डबल डेकर बस?
1. एकूण 65 प्रवासी प्रवास या बसमध्ये करु शकतात. पहिल्या मजल्यावर 30 सीट दुसऱ्या मजल्यावर 35 सीट
2. एकूण 96 प्रवासी एका वेळी बसून आणि उभे राहून प्रवास करु शकतात.
3. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस सिस्टीम, प्रवाशांसाठी सीट बेल्ट या बसमध्ये आहे
4. प्रत्येक सीटच्या खाली मोबाईल फोन चार्जिंगची व्यवस्था आहे
5. डबल डेकर बसमध्ये दोन्ही बाजूंनी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत
6. इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण कमी होईल
7. पूर्णपणे वातानुकूलित असल्याने शिवाय आरामदायी सीट्सवर असल्याने प्रवाशांना सर्व सोयी-सुविधायुक्त आरामादायी प्रवास या निमित्ताने अनुभवता येणार आहे
संबंधित बातम्या
Mumbai AC Double Decker Bus: 'बेस्ट'चं आधुनिक पर्व सुरू; देशातील पहिल्या एसी डबलडेकर बसचे उद्घाटन
मुंबईकरांचा प्रवासाचा आनंद होणार दुप्पट, उद्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार 'डबल डेकर इलेक्ट्रिक बस'