एक्स्प्लोर
डबे मागे सोडून पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन पुढे गेलं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पंचवटी एक्स्प्रेस मनमाडहून सीएसएमटीच्या दिशेने जात असताना कल्याणजवळ हा प्रकार घडला.

कल्याण : मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय आज पुन्हा आला. पंचवटी एक्स्प्रेसचं कपलिंग तुटल्याने काही डबे मागे सोडून तीन डब्यांसह इंजिन पुढे निघून गेलं. कल्याणजवळ ही घटना घडली. यामुळे रेल्वेमधील अनेक प्रवाशांचा खेळंबा झाला असून सर्व जलद ट्रेन मागे रखडल्या आहेत.
पंचवटी एक्स्प्रेस मनमाडहून सीएसएमटीच्या दिशेने जात असताना कल्याणजवळ हा प्रकार घडला. इंजिन पुढे गेलं असून गाडीचे डब्बे पत्री पुलाजवळ आहेत.
यापूर्वीही अशीच घटना घडली होती, त्यावेळी मोठा अनर्थ टळला होता. आज पुन्हा या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. परंतु यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पंचवटी एक्स्प्रेस मनमाडहून सीएसएमटीच्या दिशेने जात असताना कल्याणजवळ हा प्रकार घडला. इंजिन पुढे गेलं असून गाडीचे डब्बे पत्री पुलाजवळ आहेत.
यापूर्वीही अशीच घटना घडली होती, त्यावेळी मोठा अनर्थ टळला होता. आज पुन्हा या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. परंतु यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























