धारावीत कोरोनाचा कहर, मुंबईतल्या प्रतिधारावीत मात्र कोरोनाचे केवळ दोन रुग्ण
धारावीत कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असताना धारावीसारखीच झोपपट्टीचा भाग असलेला दहिसरच्या गणपत पाटील नगर झोपडपट्टीत कोरोनाचे केवळ दोन रुग्ण सापडले आहेत.
मुंबई : एकीकडे धारावीतील रुग्णसंख्या दर दिवसाला वाढतेय. मात्र, दुसरीकडे मुंबईच्या पश्चिम उपनगरांत `प्रतिधारावी´ अशी ओळख असणाऱ्या दहिसरच्या गणपत पाटील नगर झोपडपट्टीत कोरोनाचे केवळ दोन रुग्ण सापडलेत. आतापर्यंत गणपत पाटील नगरमध्ये 10 हजार लोकांच्या स्क्रिनिंग झाल्या आहेत. यापैकी, केवळ 15 लोकांमध्येच कोरोनाची लक्षणे आढळली. मात्र, लक्षणे असतानाही हे लोक निगेटिव्ह होते. याठिकाणी आतापर्यंत केवळ दोन महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत.
आर नॉर्थ या वॉर्डमधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या सर्वात कमी म्हणजे 50 इतकी आहे. दहिसर गांव, केतकीपाडा, गणपत पाटील नगर अशा परिसराचा मिळून बनलेल्या आर नॉर्थ वॉर्डनं कोरोनाची रुग्ण संख्यावाढ रोखण्यात बरंचसं यश मिळवलेलं दिसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चाळींमध्ये वाढण्यास सार्वजनिक शौचालय देखील कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. ही बाब लक्षात घेऊन भांडूप येथील पाटकर कँपाउंड येथे सार्वजनिक शौचालयामध्ये प्रत्येक शौचालयाच्या वरती निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र बसवण्यात आलं आहे. याचा फायदा शौचालयाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण होते आणि नागरिकांना देखील कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळण्यास मदत होते.
राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी
गोवंडी-शिवाजीनगरचा मृत्युदर वाढला दोन मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईचा मृत्युदर 4% आहे तर गोवंडी-शिवाजीनगरचा तब्बल 13.4 % इतका असल्याचा दावा भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. आकडे लपवण्यासाठी ठाकरे सरकार वॉर्ड निहाय आकडेवारी देत नसल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वॉर्डात फक्त 24 तासात 6 मृत्यूची नोंद झाली आहे.
लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत 91 हजार गुन्हे दाखल!
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची वाताहत कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व अन्य अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणेच सफाई कामगारही योद्ध्यासारखे काम करत असताना मुंबई महापालिका मात्र त्यांना भेदभावपूर्ण वागणूक देत आहे. इतरांप्रमाणे त्यांच्याही जीवाला मोठा धोका असताना त्यांना महिन्याभरासाठी केवळ एक कॉटन मास्क व हातमोजे यावर काम करावे लागत आहे.
Amit Thackeray Lockdown Help | अमित ठाकरेंकडून डॉक्टरांना चार हजार हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सची मदत