एक्स्प्लोर

Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द

Mumbai Bike Taxi : मुंबईत बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई होणार आहे. रॅपिडो, ओला, उबरच्या बाईक टॅक्सी परवान्यांवर परिवहन विभागाने गंडांतर आणत नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.

Mumbai Bike Taxi Crackdown : मुंबईत बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सीविरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. आतापर्यंत आरटीओकडून बाईक जप्त करून चालकावर कारवाई केली जात होती. मात्र आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाईक चालकांसोबतच बाईक मालकावरही थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे रॅपिडो, ओला आणि उबरला देण्यात आलेला बाईक टॅक्सी परवाना तात्पुरता रद्द करण्याचा निर्णयही परिवहन विभागाने घेतला आहे.

Rapido, Ola, Uber ला कागदपत्रांसाठी मुदत

सरकारने या कंपन्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता. मात्र त्या कालावधीत कागदपत्रे सादर न केल्याने सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, कंपन्यांना आणखी एक महिन्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीतही कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल.

फक्त ई-बाईकला होती परवानगी

सरकारने सुरुवातीला पर्यावरणपूरक वाहतूक वाढावी आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या उद्देशाने ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली होती. मात्र ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाईकऐवजी पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकचा वापर सुरू ठेवला. वारंवार कारवाई करूनही नियमांचे पालन होत नसल्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता चालकासह मालकावरही गुन्हा

नव्या निर्णयानुसार पेट्रोल बाईक टॅक्सी चालवताना आढळल्यास केवळ चालकावरच नव्हे तर बाईक मालकावरही थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच संबंधित बाईकही जप्त केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील बेकायदा बाईक टॅक्सी सेवा बंद होण्याची शक्यता असून हजारो चालकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
सावधान! हवामानत मोठा बदल, 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाचं आवाहन
सावधान! हवामानत मोठा बदल, 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाचं आवाहन
Devendra Fadnavis : डेटा सेंटर गुंतवणुकीला वेग; कंपन्यांना त्वरित जागा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
डेटा सेंटर गुंतवणुकीला वेग; कंपन्यांना त्वरित जागा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget