NEET Exam Result: मोठी बातमी: नीट युजी परीक्षेचा रिझल्ट जाहीर, निकाल पाहण्यासाठी काय कराल?
NEET Education: नीट परीक्षेचा निकाल जाहीर. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रीय चाचणी संस्थेने शनिवारी दुपारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (UG) अर्थात नीट युजीचा निकाल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला आज दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वी पाच मिनिटं आधी एनटीएकडून नीट युजीचा निकाल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नीट परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येण्यासाठी शहरनिहाय आणि केंद्रनिहाय स्तरावर या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना exams.nta.ac.in. या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येईल.
गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. मे महिन्यात ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत पेपरफुटीसह गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 40 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय चाचणी संस्थेला अर्थात एनटीएला केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एनटीएकडून NEET UG परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
The National Testing Agency (NTA) has declared the state-wise and centre-wise data of the results of the National Eligibility cum Entrance Test (NEET) 2024.
— ANI (@ANI) July 20, 2024
नेमका प्रकार काय?
यंदाच्या नीट परीक्षेचा पेपर झारखंडमधील हजारीबाग शहरात परीक्षेच्या 45 मिनिटं आधी फोडण्यात आला. त्यानंतर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरं विकण्यात आल्याचा दावा एनटीएने न्यायालयात केला होता. या दाव्याविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून शंका उपस्थित करण्यात आली होती. फक्त 45 मिनिटांत 180 प्रश्नांची उत्तरं सोडवून ती पेपर विकत घेणाऱ्यांना पुरवण्यात आली. ही उत्तरं पाठ करून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला, या एनटीएच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर
नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या होत्या. ही परीक्षा 11 ऑगस्टला होणार आहे. नीट पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल. विद्यार्थी नीट पीजी परीक्षेचं नवं वेळापत्रक एनबीईची वेबसाईट natboard.edu.in वर पाहू शकतात. नीट पीजी परीक्षा ही नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकार, नेट परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आली होती.
आणखी वाचा
लातूर नीट प्रकरणाचा म्हाेरक्या एन गंगाधर अप्पास कोर्टाने सुनावली १९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI