एक्स्प्लोर
नवी मुंबईतील लॉजमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या
जुहूगावमधील संकल्प लॉजमध्ये ही घटना घडली. अशोक दळवी नावाच्या इसमासोबत आलेल्या महिलेची हत्या आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशीमध्ये असलेल्या जुहूगावातील संकल्प लॉजमध्ये एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे.
जुहूगावमधील संकल्प लॉजमध्ये ही घटना घडली. अशोक दळवी नावाच्या इसमासोबत आलेल्या महिलेची हत्या झाली आहे. अशोक दळली महिलेसह लॉजमध्ये आला. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना 306 क्रमांकाच्या खोलीत जाताना पाहिलं. पण काही वेळाने अशोक दळवी एकटाच निघून गेला. त्यामुळे लॉज कर्मचाऱ्यांना संशय आला.
कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन पाहिलं असता महिला अर्धनग्न अवस्थेत बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गळा चिरुन तिची हत्या केल्याचं समोर आलं. अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला.
लॉज चालकांनी याबाबत त्वरित वाशी पोलिसांना कळवलं. हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र हत्या करुन आरोपी पसार झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
आरोपी अशोक दळवीचं वय 45 ते 50 वर्षांच्या दरम्यान आहे. आरोपी घणसोली इथला राहिवासी आहे. तर मृत महिला मुंबईतील नेहरुनगर इथे राहत होती. संबंधित महिला आणि फरार आरोपी या लॉजमध्ये वारंवार येत असल्याची माहिती चालकांनी पोलिसांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement