एक्स्प्लोर
दीड महिन्यापासून बेपत्ता मुंबईकर तरुणीची हत्या?
मुंबईतील प्रसिद्ध सॅलॉनमध्ये कार्यरत असलेली 28 वर्षीय कीर्ती व्यास गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता आहे.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सॅलॉनमध्ये कार्यरत असलेली 28 वर्षीय तरुणी कीर्ती व्यासची हत्या झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कीर्ती गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता आहे.
कीर्ती व्यास बीब्लंट सॅलॉनच्या अंधेरी पश्चिम भागातील शाखेत फायनान्स मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. हे सॅलॉन अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरची घटस्फोटित पत्नी अधुनाच्या मालकीचं आहे. कीर्ती बेपत्ता झाल्यानंतर फरहाननेही कीर्तीला शोधण्यासाठी ट्विटरवरुन आवाहन केलं होतं.
कीर्तीची हत्या झाल्याचं संशय पोलिसांनी व्यक्त केल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.
कीर्ती ग्रँट रोडमधील भारत नगर परिसरात राहत होती. ती 16 मार्चला सकाळी घराबाहेर पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती 8 वाजून 50 मिनिटांनी बिल्डिंगबाहेर पडताना दिसते.
त्यानंतर कीर्तीच्या दोन सहकाऱ्यांनी तिला लिफ्ट दिली. तिला ग्रँट रोड स्टेशनजवळ असलेल्या नवजीवन सोसायटीजवळ सोडण्यात आलं. त्यानंतर कीर्तीचा ठावठिकाणा लागत नाही. तिचा फोनही तेव्हापासून स्वीच्ड ऑफ आहे.
कीर्तीच्या आईने सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिला फोन केला होता, मात्र संपर्क होऊ शकला नव्हता. रात्रीपर्यंत कीर्ती घरी न आल्यामुळे तिच्या पालकांनी डी बी मार्ग पोलिसात तक्रार दाखल केली. दीड महिने उलटून पोलिसांना तिला शोधण्यात यश आलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement