(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai University : विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या जागा भरल्या, CBSE विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त जागा वाढवणार
Mumbai University Admission News : मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर नामांकित कॉलेजच्या जागा पूर्ण भरणार असल्याची माहिती आहे.
Mumbai University Admission News : मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर नामांकित कॉलेजच्या (Mumbai University Collage) जागा पूर्ण भरणार असल्याची माहिती आहे. सीबीएसई, आयसीएसई (CBSE, ICSE) 12 वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी निकाल जाहीर झाल्यानंतर नामांकित कॉलेजच्या जागा विद्यापीठाकडून वाढवल्या जाणार आहेत तर काही महाविद्यालयांनी गुणवत्ता याद्या राखून ठेवल्या आहेत. मुंबई विद्यापीठाची पदवी प्रथम वर्ष (1st Year Admission) प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नामांकित कॉलेजच्या सर्वच जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या गुणवत्ता यादी नंतर त्या जागा रिक्तच राहिल्या आहेत त्या सुद्धा तिसऱ्या फेरीमध्ये पूर्ण भरल्या जात आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत तिसऱ्या गुणवत्ता यादीत पाच ते सात टक्क्यांनी कट ऑफ घसरल्याने अनेक प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळणार आहे.
16 जुलैपर्यंत आपल्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचे आहेत. तर काही मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजेस तसेच स्वायत्त कॉलेजेसने आपल्या गुणवत्ता याद्या राखून ठेवल्या आहेत. सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांना सुद्धा नामांकीत कॉलेज मध्ये प्रवेश घेता यावा यासाठी त्यांचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नामांकीत कॉलेज मध्ये या विद्यार्थ्यांच्या विशेष अॅडमिशनसाठी जागा वाढवाव्या लागणार आहेत. त्यासाठी कॉलेजेसने विद्यापीठाकडे अर्ज करायचा आहे आणि त्यानुसार जागा वाढून घ्यायच्या आहेत.
यूजीसीने दोन दिवसापूर्वी परिपत्रक काढून सर्व विद्यापीठांना सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू नयेत अशा सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार विद्यापीठाकडून लवकरच निर्णय घेऊनच या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सूचना सर्व कॉलेजेसला देण्यात येतील.
विद्यापीठाने राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आणि आता विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले जाणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI