(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai: पुन्हा लॉकडाऊन? मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, आज 3671 नव्या रुग्णांची नोंद
Coronavirus In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय.
Coronavirus In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज तीन हजारांहून अधिक रुग्णांची रुग्णांची झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत आज 3 हजार 671 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाच मृत्यू नाही. याशिवाय, 371 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 49 हजार 159 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 96 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 11 हजार 360 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 505 दिवसांवर पोहचलाय.
मुंबई महानगरपालिकेचं ट्वीट-
ओमिक्रॉनच्या नवीन प्रकरणांसह देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होत असल्यानं कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड टास्क फोर्सची तातडीनं बैठक बोलावलीय. दरम्यान, टाक्स फोर्सची बैठक सुरू असून राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जाऊ शकतात. तसेच राज्यात पुन्हा एकदा लाकडाऊन लागणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ओमिक्रॉनच्या उद्रेकामुळं मुंबईसह अनेक ठिकाणी नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आलीय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईत आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha