एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Rains : मुंबईत आजही पावसाची संततधार; ठाणे-सीएसएमटी वाहतूक विस्कळीत, तर रस्ते वाहतूक धीम्या गतीनं

मुंबईतल्या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, तर रुळावर पाणी आल्याने ठाणे-सीएसएमटी वाहतूक विस्कळीत

मुंबई : येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचसोबत नैऋत्य वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.  सध्या मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. वसई-विरार आणि पालघरमध्ये देखील सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

मुंबईची लाईफलाईन सुरळीत

मुंबईत संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. तर सध्या ठाणे-सीएसएमटी लोकल सेवा ठप्प झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल स्टेशनवर थांबून आहेत. मुंबईकडे जाणारे ट्रॅक पाण्याखाली आहेत. पातळी वाढते त्यामुळे लोकल वाहतूक बंद झाली आहे. जर असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वे आणि हार्बर या मार्गावरची लोकलसेवाही ठप्प होऊ शकतो.

रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरु

मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावासाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे पश्चिम दृतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासून पावसानं अजिबात उसंत घेतली नाहीये. त्यात रस्त्यावर साचलेलं पाणी आणि खड्डे यामळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. दरम्यान हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत अनेक भागात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3 ते 4 तास मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो.

तसेच आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात साधारण 200 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद ही येत्या 24 तासात ह्या तिन्ही जिल्ह्यात बघायला मिळू शकते. मुंबई, ठाणे आणि पालघरचा विचार केला तर साधारण 19 ते 22 जुलै दरम्यान ह्या तिन्ही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असेल. ज्यात ह्या चार दिवसांच्या दरम्यान आपल्याला 100 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये बघायला मिळू शकतो. 

रायगड परिसरात देखील पुढील 3 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील अनेक भागात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. अशातच पुढील 3-4 तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी डोंगर खचल्याच्याही घटना बघायला मिळाल्या आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Embed widget