एक्स्प्लोर
'मामा' बनवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध, दिलीप लांडेंविरोधात मनसेचे फ्लेक्स
दिलीप लांडे हे नुकतेच मनसेतून शिवसेनेत गेले आहेत.

मुंबई : मनसेने शिवसेनेचे नगरसेवक आणि सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांना टार्गेट करत मुंबईतील कुर्ला चांदिवली भागात फ्लेक्सबाजी केली आहे. दिलीप लांडे यांच्यावर आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा आरोप होत आहे. सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे दिलीप लांडे यांना विभागात आणि महापालिकेत 'मामा' या नावाने संबोधलं जातं. त्याचाच वापर करुन, "चांदिवली विधानसभेतील उद्यानाचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत, महापालिकेला 'मामा' बनवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध," असा मजकूर मनसेने या फ्लेक्सवर लिहिला आहे.
कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे दिलीप लांडे हे नुकतेच मनसेतून शिवसेनेत गेले आहेत. कुर्ला चांदिवली भागातील आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याच्या प्रयत्नावरुन शिवसेनेवर टीका होत आहे. त्यामुळे मनसेने आता दिलीप लांडे यांना टार्गेट करत, ते राहत असलेल्या चांदिवली विभागात फ्लेक्सबाजी केली आहे.
कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे दिलीप लांडे हे नुकतेच मनसेतून शिवसेनेत गेले आहेत. कुर्ला चांदिवली भागातील आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याच्या प्रयत्नावरुन शिवसेनेवर टीका होत आहे. त्यामुळे मनसेने आता दिलीप लांडे यांना टार्गेट करत, ते राहत असलेल्या चांदिवली विभागात फ्लेक्सबाजी केली आहे. आणखी वाचा























