एक्स्प्लोर

मोठी बातमी: 36 तासांचा मेगाब्लॉक संपला, ठाणे स्थानकातून पहिली लोकल रवाना, मध्य रेल्वे बॅक ऑन ट्रॅक!

Mumbai Central Railway Megablock : मुंबई मध्यरेल्वेचा तीन दिवसांपासून असलेला मेगाब्लॉक आता संपला आहे, त्यामुळे मुंबईकरांची प्रवासाची गाडी पुन्हा रुळावर येणार आहे.

Mumbai : मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या लोकल मेगाब्लॉक (Mumbai Megablock Over) आता संपला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) स्थानकातून 36 तासांचा मेगाब्लॉक संपल्यानंतर पहिली लोकल गाडी रवाना झाली आहे. यानंतर आता मध्य रेल्वेवरची वाहतूक सुरळीत होताना पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून 36 तासांचा, तर ठाणे (Thane) स्थानकातून 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता, हे दोन्हीही मेगाब्लॉक संपल्याची घोषणा रेल्वेच्या वतीने करण्यात आली आहे. 

धीम्या आणि जलद गतीच्या लोकल रवाना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पहिली धीम्या गतीची लोकल रवाना झाली आहे. त्या मागोमाग आसनगावला जाणारी जलद गतीची गाडी देखील रवाना झाली आहे. मध्य रेल्वे प्रमाणेच हार्बर मार्गावरील पहिली  लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेलच्या दिशेने रवाना झाली आहे.

जंबो ब्लॉक, मेगाब्लॉक संपले

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली लोकल 1 वाजून 10 मिनिटांनी टिटवाळ्यासाठी रवाना झाली आहे.  ठाणे स्थानकाचा 63 तासांचा विशेष ब्लॉक देखील संपला आहे. ठाणे स्थानकात घेण्यात आलेला 63 तासांचा जंबो मेगाब्लॉक संपला आहे, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता प्रवासी सीएसएमटी ते ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा असा प्रवास करू शकतात.

फलाट रुंदीकरणाचे काम पूर्ण

गुरुवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात जम्बो मेगाब्लॉक सुरू करण्यात आला होता, आता या मेगाब्लॉकचं काम पूर्ण झालं आहे. आज दुपारी साडेतीनची वेळ दिली असतानाही, काम लवकर पूर्ण झाल्याने मेगाब्लॉक लवकर संपवण्यात आला आहे. रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या वेगवान कामामुळे हे काम वेळेआधीच पूर्ण झालं. या घडीला ट्रॅक बाजूला सरकवणं, ओव्हरहेड वायर यंत्रणा उभी करणं, सिग्नलिंग यंत्रणा उभी करणं, पॉइंट्स तयार करणं, क्रॉस ओव्हर तयार करणं अशी महत्त्वाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं देखील काम जवळपास पूर्ण झालं असून सिमेंटिंग करण्याचं काम पण पूर्ण झालं आहे. त्यामुळे लवकरच या प्लॅटफॉर्मवरून प्रवास सुरू करण्यात येईल.

ठाण्याच्या पाच नंबर प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. लवकरच अंतिम परवानगी देऊन नवीन फलाट वापरासाठी खुला केला जाणार आहे.

हेही वाचा:

Ramtek Lok Sabha Result 2024 : रामटेकमध्ये कोण बाजी मारणार? काँग्रेस की शिंदे गट? वाचा लोकसभेचा निकाल एका क्लिकवर सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget