Ramtek Lok Sabha Result 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघात सकाळी 10 वाजेपर्यंत काँग्रेसचे शामकुमार बर्वे आघाडीवर, राजू पारवे पिछाडीवर
Ramtek Lok Sabha Election Result 2024 : विदर्भातील नागपूरनंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्त्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक. या मतदारसंघात 10 पर्यंत काँग्रेसचे शामकुमार बर्वे आघाडीवर आहेत.
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघाचे सकाळी 10 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून काँग्रेसचे शामकुमार बर्वे हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. शामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) हे 16,000 मतांनी आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकारवर शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे (Raju Parwe) आहेत. हा कल सकाळी 10 वाजेपर्यंतचा असून अजून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल.
देशाला पंतप्रधान मिळवून देणारा मतदारसंघ अशी रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. रामटेकचा गड आपल्याकडेच राहावा, यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले, पण शेवटपर्यंत शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघावरील आपला हक्क सोडला नाही. ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात आलेले शामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) आणि शिंदे गटाचे नेते राजू पारवे (Raju Parwe) यांच्यात जोरदार लढत होत आहे.
रामटेक लोकसभा निकाल 2024 (Ramtek Lok Sabha Election Result 2024)
उमेदवार | पक्ष | |
शामकुमार बर्वे | काँग्रेस | आघाडी |
राजू पारवे | शिवसेना शिंदे गट | पिछाडी |
रामटेक मतदारसंघात यंदा 60.99 टक्के मतदान झालं.
2019 सालचा निवडणूक निकाल - (Ramtek Lok Sabha Constituency 2019 Result)
कृपाल बालाजी तुमाने (शिवसेना) - 5,97,126 मतं - विजयी
किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) - 4,70,343 मतं
2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत रामटेकमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात 2019 मध्ये 62.12% मतदान झालं. शिवसेनेचे उमेदवार कृपाल बालाजी तुमाने 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 1,26,783 मतांच्या फरकाने विजयी झाले,त्यांनी 5,97,126 मतं मिळवली. कृपाल बालाजी तुमाने यांनी काँग्रेसचे किशोर उत्तमराव गजभिये यांचा पराभव केला, त्यांना 4,70,343 मतं मिळाली.
शिंदे गटाला उमेदवार बदलणं पडणार महागात?
शिंदे गटाच्या शिवसेनेला रामटेक मतदारसंघात उमेदवार बदलणं महागात पडणार आहे. या मतदारसंघात मागील सलग दोन टर्म कृपाल तुमाने जिंकून आले, मात्र यावेळी खासदार कृपाल तुमाने यांंचं तिकीट कापण्यात आलं. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात शिंदे गटाने काँग्रेस उमेदवार राजू पारवे यांना आयात केलं आणि त्यांना तिकीट देण्यात आलं. परंतु, राजू पारवे यांच्याेक्षा कृपाल तुमाने चांगले असल्याचं जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे या निर्णयाचा शिंदे गटाला फटका बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल
महाराष्ट्रात 2019 मध्ये चार टप्प्यात लोकसभेची निवडणूक पार पडली.ही निवडणूक यूपीए आणि एनडीएमध्ये लढली गेली. यूपीएमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती. एनडीएमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढले. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने अनुक्रमे 23 आणि 18 जागा जिंकल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने 4 आणि काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला. याशिवाय, एआयएमआयएमने एक जागा जिंकली आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. त्यावेळी राज्यात 62.12% टक्के मतदान पार पडलं.
हेही वाचा: