एक्स्प्लोर

सीएसटीजवळ रेल्वे रुळावर लोखंडी रॉड, घातपाताचा डाव उधळला

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा रेल्वे रुळावर घातपाताचा डाव उधळला. छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटी स्टेशनजवळ, अप धीम्या मार्गावरील ट्रॅकवर चार फूट लांबीचा रेल्वे रुळाचा लोखंडी रॉड आढळला. तसंच रुळालगत असलेल्या सिग्नलवर दगडफेक करुन काचा फोडण्याचाही प्रयत्न केला. सीएसएटी यार्डात काम करणारे पॉईंटमन सुरेंद्रकुमार शर्मा यांच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला. सुरेंद्रकुमार शर्मा यांनी दगडफेक करणाऱ्या आणि लोकंडी रॉड ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. सुरेंद्रकुमार शनिवारी दुपारी सीएसटी यार्डात काम करत होते. त्यावेळी कर्नाक ब्रिजच्या खाली पोलजवळ एक तरुण त्यांना दिसला. हा तरुण रेल्वे रुळालगत असलेल्या सिग्नलवर दगड मारुन काचा फोडण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय अप धीम्या मार्गावरील रेल्वे ट्रॅकमध्ये त्याने रेल्वे रुळाचा लोखंडी रॉड ठेवल्याचं समोर आलं. यानंतर सुरेंद्रकुमार यांनी त्याच्या दिशेने धाव घेत तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. Amar_CST_Rod देवा सुखलाल कोल उर्फ अमर (वय 19 वर्ष) असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. हा तरुण फुगे विकण्याचं काम करतो. त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, याआधी दिवा, मुंब्रा, पनवेल या ठिकाणी यापूर्वी रेल्वे रुळावर लोखंडी रॉड ठेवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता सीएसटी स्टेशनवर अमरने रॉड ठेवल्याचं उघड झालं. परंतु अमरने हे कृत्य का आणि कोणाच्या सांगण्यावरुन केलं याचा तपास पोलिस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Embed widget