एक्स्प्लोर
शिवसैनिकांकडूनच शिवसैनिकाचा पत्ता कट्टा!
9 एप्रिलला महापालिका समितीच्या अध्यक्षपदासाठी संतोष खरात यांची ‘सामना’तून घोषणा करण्यात आली.

मुंबई : महापालिका विधी व न्याय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्तीपूर्वीच नगरसेवक संतोष खरात यांचा पत्ता शिवसैनिकांनीच कट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेतली अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे.
संतोष खरात हे वरळीच्या वॉर्ड क्रमांक 195 चे नगरसेवक आहेत. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इकडे शिवसैनिकांमध्येच चुरस रंगत असते.
9 एप्रिलला महापालिका समितीच्या अध्यक्षपदासाठी संतोष खरात यांची ‘सामना’तून घोषणा करण्यात आली. मात्र घोषणा होताच खरात यांच्या विरोधकांनी कंबर कसली आणि थेट ‘मातोश्री’ गाठली.
संतोष खरात हॉटेल्स आणि बांधकाम व्यवसायिकांवर आरटीआय टाकतात. त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात. अधिकाऱ्यांना मद्यपान करुन शिवीगाळ करतात, असे गंभीर आरोप शिवसैनिकांनीच वरिष्ठांकडे केले आहेत.
त्यामुळे सहाजिकच वरिष्ठांनी तातडीने यांची दखल घेत खरात यांना अर्ज न भरण्यास सांगितलं. नगरसेवक खरात यांचा पत्ता कापण्यामध्ये स्थानिक लोकप्रतिधिंचा पुढाकार असल्याचं कळतं.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
बातम्या
नाशिक
Advertisement
Advertisement























