एक्स्प्लोर
खारघर टोलप्रकरणी खुल्या चौकशीची परवानगी का नाही, हायकोर्टाचा सवाल
नवी मुंबई : खारघर टोल प्रकरणी लाच लुचपतप्रतिबंधक खात्याला खुल्या चौकशीची परवानगी का नाही असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारला आहे. आज खारघर टोल वसूलीच्या निविदेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हायकोर्टानं राज्य सरकारला फैलावर घेतलं आहे.
नवी मुंबईतील खारघर टोल नाक्यावर टोल वसूलीच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर निर्णयासाठी राज्य सरकारनं निर्णयासाठी वेळही मागितला होता. मात्र आता हायकोर्टानं कठोर भूमिका घेत खारघर टोलबद्दल तुम्ही निर्णय घेणार नसाल तर आम्हाला या प्रकरणात लक्ष घालावं लागेल असं हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं आहे.
खारघर टोल प्रकरणी प्रविण वाटेगावकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीवेळी हायकोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement