एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील 'एम एम मिठाईवाला' दुकानाची आग आटोक्यात
मुंबईत मालाड स्टेशनबाहेरील प्रसिद्ध 'एम एम मिठाईवाला' दुकानाला आग लागली होती.
मुंबई : मुंबईत मालाड स्टेशनबाहेरील प्रसिद्ध 'एम एम मिठाईवाला' दुकानाला लागेलली आग विझवण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.
मालाड पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर गुप्ता मार्केटमध्ये एम. एम. मिठाईवालाचं दुकान आहे. या दुकानाला आज (मंगळवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास आग लागली होती. आगीत तीन ते चार दुकानंही जळून खाक झाली आहेत.
अग्निशमन दलाचे आठ फायर स्टेशन आणि सहा वॉटर टँकर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत होते. मार्केट परिसर असल्यामुळे या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती.
एम.एम. मिठाईवाला दुकानाला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement