मुंबईकरांच्या लाईफलाईन रुळांवर, आज मोनो धावली, उद्या मेट्रो धावणार, सर्वसामान्यांना लोकलसाठी मात्र वेट अॅंड वॉच
लॉकडाऊननंतर आजपासून मोनोचा सर्वसामान्यांसाठी प्रवास खुला झालाय तर मुंबई मेट्रोचा प्रवास उद्या 19 ऑक्टोबर पासून सुरु होईल. मात्र अद्याप सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
मुंबई : लॉकडाऊननंतर आजपासून मोनोचा सर्वसामान्यांसाठी प्रवास खुला झालाय तर मुंबई मेट्रोचा प्रवास उद्या 19 ऑक्टोबर पासून सुरु होईल. मात्र अद्याप सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, मुंबईकरांची प्रतिक्षा काही अंशी तरी लवकरच संपणार आहे. लोकल प्रवासाची लिटमस टेस्ट असणारी मेट्रो 19 तारखेपासून तर मोनो आजपासूनच सर्वसामान्यांसाठी रुळावर आलीय. मात्र, त्याकरता मोनो आणि मेट्रो प्रशासनानं कडक नियमावलीही जारी केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनंतरचा सार्वजनिक वाहतूकीचा प्रवास आता पूर्वीसारखा नसेल हे नक्की.
मोनो प्रवासासाठीची नियमावली सकाळी 7.30 ते 11.40 आणि दुपारी 4.03 ते रात्री 9.27 अशा दोन टप्प्यांमध्ये मोनो धावणार मोनोतही मेट्रोप्रमाणे प्लास्टिक टोकनवर बंदी, क्युआर पेपर तिकीट, स्मार्ट कार्ड, डिजीटल तिकीट प्रणालीचा अवलंब अल्टरनेट सिटींग अॅरेंजमेंट एकाआड एक सीटवर बसण्याची परवानगी उभ्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही विशिष्ट मार्किंग केलेल्या जागेतच उभे राहून प्रवासाची परवानगी मोनोत प्रवेश करण्याआधी हेल्थ डेस्कवर स्क्रिनींग, सॅनिटायझेशन करण्यात येईल मास्क घालणे अनिवार्य मोनोच्या डब्यातील तापमान हे 24 ते 27 डिग्रीपर्यंत मर्यादित
मुंबई मेट्रो 1 ची प्रवासादरम्यानची नियमावली
मुंबई मेट्रोचा प्रवास सकाळी 8.30 ते रात्री 8.30 पर्यंतच होणार प्लास्टिक टोकनवर बंदी प्लास्टिक टोकन ऐवजी क्यआर पेपर तिकीटस्, स्मार्ट कार्ड, डिजीटल तिकीट यांचा वापर होणार अल्टरनेट सिटींग अॅरेंजमेंट प्रवाशांना एकाआड एक सीटवर बसण्याची परवानगी उभ्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही विशिष्ट मार्किंग केलेल्या जागेतच उभे राहून प्रवासाची परवानगी प्रवाशांनी मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसींग पाळणे बंधनकारक गर्दी होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावरुन मर्यादित प्रवासी संख्येलाच प्रवेश देण्यात येईल प्रवेश द्वारांवरच प्रवाशांकरता सूचना आणि प्रोटोकॉलची माहिती देण्यात येईल. गर्दी लक्षात घेऊन मर्यादित प्रवासी संख्येलाच आत सोडले जाईल कॉमन टचींग पॉईंटस् स्टेशन, तिकीट खिडकी, सीट, टेन्सचे खांब यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जाणार ट्रेनच्या आत तापमान नियंत्रण आणि मोकळ्या हवेसाठी व्यवस्था ट्रेनच्या आतील तापमान हे 25 ते 27 डिग्री इकते ठेवले जाईल. मोकळ्या हवेसाठी मेट्रोचे डंपर वेळोवेळी उघडे ठेवले जाईल. मेट्रोचे द्वार प्रत्येक स्टेशनवर 30 सेकंद खुले राहिल तर, टर्मिनस स्टेशनवर 180 सेकंद खुले राहिल जेणे करुन मोकळी हवा आत प्रवेश करु शकेल मेट्रो स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग होईल ठिकठिकाणी प्रवाशांना सॅनिटाझरची सोय उपलब्ध असेल स्वच्छतेसाठी विशेष प्रोटोकॉल मेट्रोच्या नव्या प्रोटोकॉलनुसार मेट्रो स्थानके आणि ट्रेन्सची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण होणार मेट्रो स्थानकांची सुरक्षा अधिक कडक केली जाईल