एक्स्प्लोर
Advertisement
झाडाच्या धक्क्याने बाईकवरुन पडून मुंबईत उद्योजकाचा मृत्यू
मुंबई : बाईकवरुन जाताना झाडाचा धक्का बसून खाली पडल्यानंतर ट्रकखाली चिरडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू ओढावला आहे. मुंबईतील चिंचपोकळी रेल्वे स्थानकाबाहेर घडलेल्या अपघातात सुप्रसिद्ध कापड उद्योजक शाहीद खान यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
शाहीद खान हे मुंबईतील दाऊद खान टेलर अँड क्लोदियर या पुरुषांच्या कपड्यांच्या दुकानाचे मालक होते. 44 वर्षीय शाहीद खान आपल्या आर्किटेक्ट मित्रासोबत बाईकवर मागे बसून महंमद अली रोडवरुन सायनच्या दिशेने चालले होते. त्यावेळी चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळ एका अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडाचा धक्का बसून ते खाली पडले.
खाली पडल्यानंतर दुर्दैवाने एका ट्रकखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मित्राला झाडाचा धक्का बसला नव्हता, त्यातच त्याने हेल्मेट घातल्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नाही. शाहीद यांच्या पश्चात पत्नी आणि 4 मुलं आहेत.
अपघाताप्रकरणी 22 वर्षीय ट्रकचालक गोरख चौधरीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवध आणि रॅश ड्रायव्हिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
फॅक्ट चेक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
जालना
Advertisement