एक्स्प्लोर
मुंबईच्या केईएम रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर चार दिवसांपासून बेपत्ता
पोलिस आणि कुटुंबीय त्याचा प्रयत्न घेत आहेत. अजिंक्यला शोधण्यासाठी सोशल मीडियावर डॉक्टरांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयातील 24 वर्षीय इंटर्न डॉक्टर अजिंक्य मौर्य हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. चिंताग्रस्त डॉक्टर मौर्य यांच्या कुटुंबाने भोईवाडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे. अजिंक्य सोमवारी संध्याकाळपासून कुठे आहे, हे कोणालाच माहित नाही.
पोलिस आणि कुटुंबीय त्याचा प्रयत्न घेत आहेत. अजिंक्यला शोधण्यासाठी सोशल मीडियावर डॉक्टरांनी शोधमोहीम सुरु केली आहे. चार दिवसांपूर्वी अजिंक्य मेडिटेशन करत होता. सोमवारी संध्याकाळी त्याने आपल्या मित्राला मला जावं लागेल एवढंच सांगितलं आणि तो हॉस्टेलबाहेर पडला. परंतु चार दिवस झाले तरी अजिंक्य हॉस्टेलवर परतलेला नाही.
अजिंक्य त्याचा मोबाईलही हॉस्टेलमध्येच ठेवून गेल्याने त्याला शोधण्यात अडचणी येत आहेत. दुसरीकडे अजिंक्यच्या कुटुंबाने यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे. परंतु जर डॉक्टर अजिंक्य मौर्य कुठे दिसल्यास त्वरित पोलिसांशी अथवा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करण्याचं आवाहन सोशल मीडियावरुन करण्यात आलं आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
नाशिक
मुंबई
Advertisement
Advertisement





















