Mumbai : डिजिटल साक्षरता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी मेटाची महाराष्ट्र सायबरबरोबर भागीदारी
Mumbai : मेटाचा वुई थिंक डिजिटल (We think digital) हा कार्यक्रम डिजिटल सुरक्षिततेच्या सर्वोत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करणारा आहे.
Mumbai : अधिक सुरक्षित ऑनलाइन वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्रातील किशोरवयीन आणि तरुणांसाठी डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मेटाने (Meta) महाराष्ट्र सायबरसोबत भागीदारी केली आहे. वुई थिंक डिजिटल (We think digital) हा कार्यक्रम डिजिटल सुरक्षिततेच्या सर्वोत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करणारा आहे. तसेच, तरुणांना डिजिटल साक्षरता जागरुकता यावरील सत्रे, प्रशिक्षण संसाधने, ज्ञान भांडार, ज्यामध्ये बाल आणि प्रौढ सुरक्षा स्वयं-सहाय्य्य सामग्री, सुरक्षा व्हिडिओ, संसाधने आणि सहाय्यक मार्गदर्शिका यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढत्या सायबर-गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच ऑनलाइन अपाय हाताळण्यासाठी किशोरांना साधने आणि संसाधने यासह सुसज्ज करणे हे मेटाचे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षण मॉड्युल सायबर सुरक्षिततेच्या सर्व पैलूंवर आणि डिजिटल साक्षरतेच्या मुलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करणारा आहे. ज्यामध्ये इंटरनेट ब्राउझ करणे, सायबर गुंडगिरी (सायबर बुलिइंग), लैंगिक छळ, ट्रोलिंग इ. बाबींचा समावेश आहे.
यावेळी, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) यशस्वी यादव म्हणाले, “तंत्रज्ञान आणि इंटरनेटने अनेकांचे जीवन सक्षम केले असताना, सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येने, या गुन्ह्यांमुळे प्रभावित झालेल्यांच्या जीवनावर अपरिवर्तनीय परिणाम होणे सुरूच आहे. आज अधिकाधिक तरुण इंटरनेटचा वापर करत आहेत आणि त्यांना विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रवेश उपलब्ध आहे आणि म्हणून आपण त्यांना शक्तिशाली साधने, संसाधने आणि ज्ञान प्रदान करणे अत्यावश्यक आहे, जे त्यांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यास सहाय्यभूत होतील. या उपक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी मेटाने आमच्याबरोबर भागीदारी केल्याबद्दल आम्ही मेटाची प्रशंसा करू इच्छितो.”
सदर सहयोगाविषयी बोलताना, ट्रस्ट अँड सेफ्टी, फेसबुक इंडियाचे (मेटा) प्रमुख सत्य यादव म्हणाले, “जेव्हा तरुण लोकांबाबत विचार केला जातो तेव्हा आमची व्यासपीठे ही वयानुरूप उचित सुरक्षितता निर्माण करण्याबरोबरच जबाबदार सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी डिझाईन केलेली आहेत. तरुणांना सुरक्षित वाटण्याबरोबरच आमच्या व्यासपीठाचा लाभ त्यांना मिळावा हे सुनिश्चित करण्याकरिता आम्ही सतत नवनवीन तंत्रज्ञान संशोधित करत आहोत. भागीदारी एक अशी परिसंस्था तयार करेल जी तरुणांना इंटरनेटचा, जे केवळ सुरक्षितच नव्हे तर त्यांना वाढण्यास सक्षम देखील करेल, उपयोग करण्याविषयी शिक्षित करण्यास मदत करेल.”
मेटाच्या वुई थिंक डिजिटल या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांचा समावेश आहे. यामाध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांतील सुमारे 10,000 तरुणांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवते. यापूर्वी, मेटाने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आसाममधील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असेच प्रशिक्षण आणि कार्यक्रम संचालित केले आहेत. मेटाचे वुई थिंक डिजिटल (We Think Digital) हे, डिजिटल नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याचे एक माध्यम आहे.
महाराष्ट्र सायबर संदर्भात :
महाराष्ट्र सायबर ही महाराष्ट्रासाठी सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा यासाठी असलेली राज्य नोडल एजन्सी आहे, जी सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता मोहिमा राबवण्यामध्ये सतत व्यस्त असते. ही एजन्सी सायबर गुन्हे अन्वेषण प्रयोगशाळा तयार करणे, सायबर पोलीस स्टेशन्स विकसित करणे आणि महाराष्ट्रातील पोलीस बंधू आणि नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल आवश्यक ती सर्व जागरुकता निर्माण करण्यात गुंतलेली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BMC Notice To Mumbai Metro: मुंबई मेट्रो एकच्या 11 मालमत्तांना पालिकेकडून जप्तीची नोटीस
- Mumbai Metro: मुंबईकरांना नववर्षाची भेट; 'मुंबई मेट्रो 7, 2A'चे गुढीपाडव्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- Mumbai : गर्दीच्या स्थानकांमध्ये आता एकमजली स्टेशन, मुंबईतील 19 स्थानकांचा पुनर्विकास होणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha