Railway Megablock | पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
मुंबई : रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी एकदा रेल्वेचं वेळापत्रक पाहून बाहेर पडावं.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे मार्गावर सकाळी सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड आणि कल्याण दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून धावतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बोरीवली ते भार्इंदर या स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल गोरेगाव, बोरिवली ते वसई रोड यादरम्यान जलद मार्गावर धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे दिशेकडे रविवारी सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत चुनाभट्टी, वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या तर सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत सीएसएमटी, वडाळा रोडहून वाशी, बेलापूर, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी 9.56 ते दुपारी 4.16 सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगाव दिशेकडे, तसेच सकाळी 9.53 ते दुपारी 2.44 पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. तसेच सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 पर्यंत गोरेगाव, वांद्रेहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील. मेगा ब्लॉकदरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल-कुर्ला या मार्गावर विशेष लोकल धावतील.