'संसदीय कामकाजात सरकारला रस नाही, 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन', देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Assembly Winter Session : राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र हे अधिवेशन कमी काळाचं असल्याचं सांगत विरोधकांनी टीका केली आहे.
!['संसदीय कामकाजात सरकारला रस नाही, 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन', देवेंद्र फडणवीसांची नाराजी Maharashtra Assembly Winter Session 2021 Devendra Fadnavis Allegation on Thackeray Sarkar about adhiveshan timing 'संसदीय कामकाजात सरकारला रस नाही, 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन', देवेंद्र फडणवीसांची नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/16/6c4c763e005e9dd1b30a1e1eefe0792c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Assembly Winter Session : राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र हे अधिवेशन कमी काळाचं असल्याचं विरोधकांनी टीका केली आहे. आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 4 ते 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन होणार आहे. पहिला दिवस पुरवणी मागण्यांचा असणार आहे. आमची मागणी होती की अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. संसदीय कामकाजात ठाकरे सरकारला रस नाही, अधिवेशन टाळण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारकडून होतो आहे हे स्पष्ट आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Winter Session : मोजके अपवाद वगळून खाजगी क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी? संसदेच्या आगामी अधिवेशनात 26 विधेयकं पटलावर
फडणवीस म्हणाले की, 3 दिवस ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन घ्या अशी आमची मागणी आहे. पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची मिटींग होणार आहे. त्यानंतर पुन्हा अधिवेशन कालावधी निश्चित करु असे सांगितलं आहे. 2 वर्षात एकाही अतारांकित प्रश्न, लक्षवेधीला उत्तर दिलेले नाही. याबाबत मी नाराजी व्यक्त केली आहे. प्रलंबित अतारंकित प्रश्नांना उत्तरे दिली जातील असे आश्वासन दिलं गेलं आहे. रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी होईल असे आश्वासन मिळाले आहे, असंही फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, अधिवेशन नागपूरलाच झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. जाणिवपूर्वक अधिवेशन नागपूरला घेतले जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे कारण यामागे देण्यात आले आहे, असं फडणवीसांनी म्हटलं.
22 ते 28 डिसेंबर या कालावधीत अधिवेशन प्रस्तावित
22 ते 28 डिसेंबर या कालावधीत अधिवेशन प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते प्रत्यक्ष कॅबिनेट मिटिंगलाही उपस्थित राहत नाहीत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीलाही ते ऑनलाईन उपस्थित होते. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आलं होतं. नागपूर करारानुसार वर्षातून एक तरी अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती आणि अन्य कारणं देत शिवसेना अधिवेशन मुंबईत करण्यासाठी आग्रही होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)