एक्स्प्लोर
मध्य रेल्वेवर रुळावरुन लोकलचे डबे घसरले, सुदैवाने जीवितहानी नाही
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ डाऊन मार्गावर जलद लोकलचे दोन डबे रुळावरुन घसरले. पण सुदैवानं या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई : मध्य रेल्वेवर अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ डाऊन मार्गावर जलद लोकलचे दोन डबे रुळावरुन घसरले. पण सुदैवानं या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सीएसटीएमवरुन कर्जतला जाणाऱ्या जलद ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती.
या अपघातानंतर सीएसटीएम ते भायखळादरम्यान जलद मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता. जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
दरम्यान, यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement