एक्स्प्लोर
कल्याणमधील ट्रेकरचा इरशाळगडावरील दरीत पडून मृत्यू
कल्याणमध्ये राहणारा क्षितिज सांगळे चौघा मित्रांसोबत इरशाळगडावर ट्रेकिंगला गेला होता. गडाच्या एका टोकावरुन जाताना क्षितिजचा पाय घसरला आणि तो दरीत पडला

कल्याण : पनवेलजवळच्या इरशाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या कल्याणमधील तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. क्षितिज सांगळे असं या अपघातात प्राण गमवावे लागलेल्या तरुणाचं नाव आहे. कल्याणमध्ये राहणारा क्षितिज रविवारी दुपारी चौघा मित्रांसोबत इरशाळगडावर ट्रेकिंगला गेला होता. संध्याकाळच्या सुमारास गडाच्या एका टोकावरुन जाताना क्षितिजचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. क्षितिजसोबत असलेले अतीश कासारे, सुधाकर इप्पर, निलेश कासारे सुखरुप आहेत. क्षितिज दरीत कोसळल्यानंतर त्याच्या मित्रांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला. त्यानंतर खालापूर पोलिस घटनास्थळी पोहचले. खालापूर पोलिस, गिर्यारोहकांच्या पथकाने मोठ्या शिताफीने क्षितिजचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. पोलिसांकडून पंचनाम्यानंतर क्षितिजचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
रायगड
व्यापार-उद्योग
भारत























