एक्स्प्लोर
Advertisement
मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण अॅट्रॉसिटी रद्द होऊ देणार नाही : आठवले
मुंबई : माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. त्यासाठी पंतप्रधानांशी चर्चा करण्यासही तयार आहे. मात्र अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही. अॅट्रॉसिटी रद्द करायचा असेल तर आधी अत्याचार बंद करा, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठणकावलं. राज्यभरात सुरु असलेल्या मराठा मोर्चांमधील मागण्यांबाबत बोलताना आठवले बोलत होते.
अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही
अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही. आवश्यक बदल सुचवले तर मंत्रालय विचार करेल. कोणते बदल हवेत, त्याचा मसूदा द्यावा, त्यावर निश्चित विचार केला जाईल, असंही आठवलेंनी सांगितलं. तसंच अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी आवाहन करणार असल्याचं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाला पाठिंबा
मराठा आरक्षणाबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. 25 टक्के आरक्षण देऊन हा प्रश्न सुटू शकतो. यासाठी घटनेत बदल करावा लागेल. पण यासाठी प्रयत्न करण्याची आणि पंतप्रधानांशी चर्चा करण्याची तयारी माझी तयारी आहे. प्रत्येक राज्यात आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत आहे. या सर्व समाजांना क्रिमीलेयरमध्ये आरक्षण द्यायला हवं."
मराठा मोर्चांमुळे दलितांमध्ये अस्वस्थता नाही!
"मराठा मोर्चांमुळे दलित समाजात अस्वस्थता नाही. शिर्डीत 7 ऑक्टोबरला दलित-मराठा ऐक्य परिषद बोलावली आहे. आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत आणि दोन्ही समाजात ऐक्य निर्माण करणं हा या परिषदेचा हेतू आहे. या परिषदेला सर्व पक्षाच्या आणि मराठा संघटनांच्या नेत्यांना आमंत्रित करणार आहे. दलित-मराठा समाजात फूट पाडणं राज्याच्या हिताचं नाही, दोघांना एकमेकांची गरज आहे," असंही आठवलेंनी नमूद केलं.
मराठ्यांचे मोर्चे मुख्यमंत्र्यांविरोधात नाही
राज्यातील मराठ्यांचे मोर्चे हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहेत, असं वाटत नाही. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लागणार नाही. पाच वर्ष सरकारला कुठलाही धोका नाही. मराठा नेत्यांनी आधीच्या मराठा मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा, असा सल्ला रामदास आठवलेंनी दिला.
नागराज मंजुळे आपलेच
दरम्यान, दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या विधानानंतर झालेल्या वादावर बोलताना आठवले म्हणाले की, "नागराज मंजुळे आपलेच आहे. नागराजशी फोनवर चर्चा झाली. त्याच्याविरोधात मोर्चे काढू नका, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. शिवाय 'पँथर'वर सिनेमा बनवण्याची इच्छा नागराजकडे व्यक्त केली आहे." याबाबत चर्चा सुरु असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement