एक्स्प्लोर
मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी, विलेपार्ल्यात ट्रक उलटला
मुंबई : भल्या पहाटे मुंबईकरांचा मोठा खोळंबा झाला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
विलेपार्ले येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक उलटला आहे. त्यामुळे अंधेरीच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. सांताक्रूझहून विलेपार्लेच्या दिशेने येताना डोमेस्टिक एअरपोर्टचा ब्रिज जिथे सुरु होतो, तिथेच ट्रक उलटला असल्याने पुढील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
सांताक्रूझ आणि विलेपार्ले दरम्यान असलेल्या मिलन सबवेपर्यंत वाहतूक कोंडी असल्याची माहिती मिळते आहे.
सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी मुंबईकर बाहेर पडतात आणि त्याचवेळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
दरम्यान, ट्रक उलटल्याने चालक किंवा इतर कुणाला काही दुखापत झाली आहे का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement