एक्स्प्लोर

मेट्रोसाठी BKC, धारावीतली तिवरांची झाडं तोडण्यास हायकोर्टाची परवानगी

मुंबई : मुंबई मेट्रो-3 च्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. बीकेसी आणि धारावी येथील तिवरांची झाडं तोडण्याला मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाला परवानगी दिली आहे. मुंबईला मेट्रोची आवश्यकता असून मेट्रोच्या कामात अडथळा निर्माण करणे बरोबर नाही. धावत्या मुंबईतील गर्दीवर तोडगा म्हणुन मुंबई मेट्रो गरजेची आहे, असं मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच व्यक्त केलं आहे. मुंबई मेट्रो-3 साठी सीआरझेड अंतर्गत धारावी आणि बीकेसी येथील तिवरांची झाडं तोडावी लागणार आहेत. यासंबंधी मुंबई मेट्रो-3 प्राधिकारण परवानगी साठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यानुसार सर्व्हे केला असता बीकेसी येथे 108 तिवरांची झाडं तोडावी लागणार आहेत. तर धारावी येथील तिवरांचं पुनर्रोपण करण्यात येणार आहे, असं आश्वासन मेट्रो रेल प्राधिकरणानं हायकोर्टात दिलं आहे. मेट्रो -3 साठी सरकारनं जपानकडून कर्ज घेतलं आहे. झाडं तोडण्याच्या कामात जितका विलंब होतो आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजाचा आकडाही वाढत चालल्याचं प्राधिकरणानं हायकोर्टात कळवलं. मात्र तरीही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिवरांची झाडं तोडण्यावर आक्षेप घेतला होता. मात्र केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी असल्याचे मुंबई मेट्रो रेल प्राधिकारणाने न्यायालयात स्पष्ट केले. त्यावर केंद्रीय पर्यावरण खात्याची मिळालेली परवानगी न्यायालयात येत्या मंगळवारी सादर करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. ज्याआधारे हायकोर्टानं तिवरांची झाडं तोडालया परवानगी दिली आहे. मेट्रो-3 साठी 0.91 हेक्टर बीकेसी येथे तर 0.34 हेक्टर धारावी येथे तिवरांची आणि पाणथळीची जागेवर दोन पिलर उभारायचे असल्याने सुमारे 100 हून अधिक तिवरांची झाडं तोडावी लागणार. तर मेट्रो-3 साठी संपुर्ण मुंबईत 1 हजारपेक्षा जास्त तिवारांची झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे तिवारांची झाडे तोडण्यासाठी परवानगी द्यावी अशी याचिका मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने केली होती. शिवाय जेवढी झाडे तोडण्यात येतील त्याच्या दुप्पट झाडे लावली जातील अशी ग्वाही देखील मेट्रो रेल प्राधिकरणाने न्यायालयात दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSaif Ali khan Accused Blood Sample : सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग जुळवून पाहणारABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Embed widget