एक्स्प्लोर

गुगलकडून रेल्वे स्थानकांवरील फ्री वायफाय बंद, मात्र आता 'ही' कंपनी देणार सेवा

गुगलकडून 2016 पासून जगातील काही देशांमध्ये पाच हजारहून अधिक ठिकाणी मोफत वायफाय सेवा देत आहे. मात्र त्यांनी यावर्षी भारतातील रेल्वेस्थानकांवर देण्यात येणारी मोफत वायफाय सेवा बंद करण्यात येणार असल्याबाबत घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : भारतात रेल्वे स्टेशन्सवरील गुगलकडून देण्यात येणारी मोफत वायफाय सेवा बंद होणार आहे. गुगलने त्या संदर्भात घोषणा केली आहे. भारतात आता स्वस्त दरात आणि वेगवान इंटरनेट उपलब्ध झालं आहे. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला असून आता हे इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र तरी देखील ही सेवा प्रवाशांना मिळणार आहे. मे 2020 मध्ये गुगलकडून ही सेवा बंद होणार आहे. मात्र तरी देखील ही सेवा सुरु राहील, असं रेलटेल कार्पोरेशनने सांगितलं आहे. गुगलची सेवा बंद झाल्यानंतर रेलटेल देशातील चारशेहून अधिक रेल्वेस्थानकांवर फ्री वायफाय देणार आहे. गुगलने नुकतीच भारतातील रेल्वे स्टेशनवर देण्यात येणारी मोफत वायफायची सुविधा बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. देशामधील 400 हून अधिक स्टेशनवरून ही सेवा हळूहळू बंद करण्यात येणार आहे. मोफत वायफाय सेवा बंद होत असताना इंडियन रेल्वे आणि रेलटेल कॉर्पोरेशनबरोबर काम सुरू ठेवणार असल्याचे देखील गुगलने म्हटले आहे. गुगलकडून रेल्वे स्थानकांवरील फ्री वायफाय बंद, मात्र आता 'ही' कंपनी देणार सेवा वायफाय बंद करण्याचा निर्णय कंपनीने मोबाईल डाटाचे प्लॅन परवडणाऱ्या दरात राहण्यासाठी घेतला आहे. तसेच जगभरासह भारतात मोबाईलची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सेवा बंद करण्यात आली आहे. प्रति जीबी सर्वात स्वस्त मोबाईल डाटा मिळणाऱ्या देशापैकी भारत आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात मोबाईल डाटाचे दर 95 टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. आता उपलब्ध झालेल्या स्वस्त आणि वेगवान इंटरनेटशी स्पर्धा करून सेवा अखंडितपणे सुरू ठेवणं अवघड असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 2018 पर्यंत गुगल स्टेशनवर सुमारे 80 लाख प्रति महिना वापरकर्ते रजिस्टर झाले होते. देशभरातल्या 400 रेल्वे स्थानकांवरची ही आकडेवारी आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये देशातली कनेक्टिव्हिटी आणि सेवा सुधारली असल्याचं गुगलनं आपल्या पत्रकात नमूद केलं आहे. आता रेलटेल देणार सेवा  गुगलची सेवा बंद झाल्यानंतर आता रेलटेल देशातील चारशेहून अधिक रेल्वेस्थानकांवर फ्री वायफाय देणार आहे. भारतातील ज्या रेल्वे स्टेशनवर गुगलसोबत रेलटेलची भागीदारी होती त्या सर्व स्थानकांवर रेलटेलकडून फ्री वायफायची सुविधा देण्यात येणार आहे, असं रेलटेलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut on Victory Parade Bus:गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? :संजय राऊतRohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रियाRohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
Embed widget