एक्स्प्लोर
भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पाच आरोपी अटकेत
भाईंदर: भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मागील आठ महिन्यापासून मुलीवर बलात्कार होत असल्याचं उघड झालं आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समजते आहे. नवघर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून तर तीन आरोपी अजूनही फरार आहेत.
एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच परिसरात राहणाऱ्या आठ मुलांनी अत्यंत अमानुषपणे बलात्कार केल्याची तक्रार नवघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पीडित मुलगी अडीच महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर पीडीत मुलीच्या पालकांनी पोलिसात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी, पोलिसांनी अमर सिंग, सुनील यादव, राजू पाटील, सुनील बोथ, राहुल यादव, पवन विश्वकर्मा, आणि एक अनोळखी इसम तसेच अल्पवयीन आरोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पाच आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
पीडीत मुलीच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. याचाच फायदा त्याच परिसरात राहणाऱ्या मुलांनी घेतला. गेले आठ महिने आरोपींनी या मुलीवर अमानुष अत्याचार केला. तसंच या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही तिला दिली.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपीना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. तर एका अल्पवयीन आरोपीला भिंवडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. पीडीत मुलीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement