(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! रेल्वेचा 'फर्स्ट क्लास' निर्णय, तिकीट दरांमध्ये सुमारे 50 टक्के कपात
Mumbai : लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता फर्स्ट क्लासच्या तिकीट दरांमध्ये सुमारे 50 टक्के कपात करण्यात येणार आहे.
Mumbai : लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आता फर्स्ट क्लासच्या तिकीट दरामध्ये सुमारे 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये रेल्वेकडून मिळालेली ही दुसरी भेट आहे. काही दिवसांपूर्वच रेल्वे प्रशासनानं एसी लोकलच्या भाड्यामध्ये कपाल केली होती. एसी लोकलच्या तिकीट दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले. त्यानंतर आता रेल्वेने फर्स्ट क्लासच्या तिकीट दरामध्ये कपात करत दुसरी मोठी भेट दिली आहे. आज रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी. के. तिवारी यांनी मुंबईत यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हणून लोकलची ओळख आहे. लाखो नागरिक रोज लोकलने प्रवास करतात. त्यामुळे एसी लोकलच्या तिकीटबरोबरच फर्स्ट क्लासचे तिकीट दर देखील कमी झाल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नाही, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. फर्स्ट क्लासच्या मासिक पासचे दर जैसे थे राहणार आहेत. सध्या फर्स्ट क्लासचं ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचे फर्स्ट क्लासचे तिकीट 140 रुपये असून मासिक पासची किंमत 755 रुपये इतकी आहे. रेल्वेच्या तिकीट दरामधील कपातीच्या मोठ्या निर्णयानंतर 140 रुपयांचं तिकीट आता 85 रुपयांपर्यत म्हणजे सुमारे 50 टक्के कमी होणार आहे.
एसी लोकल भाड्यात 50 टक्क्यांची कपात
आता लोकल प्रवास आणखी गारेगार होणार आहे. एसी लोकलच्या भाड्यातही 50 टक्के कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शुक्रवारी ही मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास 65 ऐवजी आता केवळ 30 रुपयांमध्ये करता येणार आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एसी लोकलही सुरु केली होती. मात्र, एसी लोकलच्या महागड्या भाड्यामुळे प्रवाशांना एसी लोकलचा प्रवास परवडत नव्हता. यामुळे एसी लोकलला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता. प्रवाशांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी केली. आता अखेरीस प्रवाशांची ही मागणी मान्य झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- AC Local Train : प्रवास गारेगार होणार, एसी लोकलच्या भाड्यात 50 टक्के कपात
- AC Local : एसी लोकल भाड्यात 50 टक्क्यांची कपात, CSTM पर्यंत जाण्यासाठी आता 'इतके' रुपये द्यावे लागतील, जाणून घ्या नवे दर
- Mumbai : AC ट्रेनसंदर्भात मोठं अपडेट, जाणून घ्या काय असेल खास...
- Mumbai local : लोकल पकडताना थोडीशी जोखीम पत्करण हा काही गुन्हा नाही: उच्च न्यायालय