एक्स्प्लोर

चेंगराचेंगरीमुळे महाराष्ट्र दु:खात, दोषींवर कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री

मुंबईतील एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केईएम रुग्णालयात जाऊन एलफिन्स्टन चेंगराचेंगरीतील जखमींची भेट घेतली. दक्षिण कोरियाचा दौरा आटोपून मुंबईत दाखल झालेले मुख्यमंत्री थेट केईएम रुग्णालयात पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते. “या दुर्घटनेमुळे महाराष्ट्र दु:खात आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 39 जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित जखमींची प्रकृती सुधारत आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेतल्यानंतर दिली. “दुर्घटनेनंतर मी परदेशातून मी सातत्याने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या संपर्कात होता. त्यांनी एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसंच एलफिन्स्टनसारख्या मुंबईतील अशा पुलांचं ऑडिट केलं जाईल. त्यासाठी युद्धपातळीवर कामाला सुरुवात होईल,” असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. “तसंच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील,” असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. https://twitter.com/CMOMaharashtra/status/913843509668413440 चेंगराचेंगरीत 22 मुंबईकरांचा बळी मुंबईतील एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. एल्फिन्स्टन- परेल पुलावर नेमकं काय घडलं?
  • सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
  • त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
  • त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
  • त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
  • गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
  • ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
  • एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली
  • सकाळी 9.30 च्यासुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.
  • जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
  • काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला
एल्फिन्स्टन-परेलला गर्दी का होते? परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत. उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात. सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे. प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मृतांविषयी हळहळ व्यक्त केली जात असतानाच या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार ठरवलं जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे, तर जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. गरज पडल्यास जखमींना उपचारांसाठी इतरत्र हलवण्यात येईल, असंही मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे, तर गंभीर जखमींना एक लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत रेल्वे करणार आहे. मृतांची नावं पुरुष मुकेश मिश्रा सचिन कदम मयुरेश हळदणकर अंकुश जैस्वाल सुरेश जैस्वाल ज्योतिबा चव्हाण रोहित परब अॅलेक्स कुरिया हिलोनी देढीया चंदन गणेश सिंह मोहम्मद शकील मसूद आलम महिला शुभलता शेट्टी सुजाता शेट्टी श्रद्धा वरपे मीना वरुणकर तेरेसा फर्नांडिस संबंधित बातम्या एल्फिन्स्टन दुर्घटना : 24 वर्षाच्या हिलोनीचा चेंगराचेंगरीत मृत्यू एल्फिन्स्टन दुर्घटना : वडिलांशी चुकामूक श्रद्धाच्या जीवावर बेतली एल्फिन्स्टन दुर्घटना : ऑफिसच्या शेवटच्या दिवशी तेरेसा यांचा मृत्यू स्टेशनवरील कामं दोन आठवड्यात सुरु करा, पियुष गोयल यांचे आदेश दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू एल्फिन्स्टन दुर्घटनेत ज्योतिबा चव्हाण यांचा मृत्यू कुटुंबाचा एकमेव आधार हरपला, मयुरेशचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : ... तर ही दुर्घटना टाळता आली असती! दहीहंडीला सलामी देणाऱ्या गोविंदाचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मुंबईतील ही स्टेशन्स मृत्यूचा सापळा! बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या! एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत? एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं? LIVE : मुंबईत एलफिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget