एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विरारमधील अर्नाळा गावात ‘बॉम्बा’बोंब
अर्नाळा समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या फॅक्ट्रीपाड्यातील प्रभात कॉलनीतल्या कचराकुंडीत सकाळी बॉम्बसदृश वस्तू सापडली.
विरार (पालघर) : विरारमध्ये कचराकुंडीत बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र बॉम्बशोधक पथकाने अधिक तपास केला असता, ती वस्तू बॉम्ब नसून, डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले आणि आजूबाजूच्या नागरिकांच्या जीवात जीव आला. अर्नाळा समुद्र किनाऱ्यालगतच्या फॅक्ट्रीपाड्यातील प्रभात कॉलनीत हा प्रकार घडला.
अर्नाळा समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या फॅक्ट्रीपाड्यातील प्रभात कॉलनीतल्या कचराकुंडीत सकाळी बॉम्बसदृश वस्तू सापडली. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत आजूबाजूच्या गावांमध्ये बोंबाबोंब झाली. त्यामुळे अर्थात, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
अर्नाळा ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी आज सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास प्रभात कॉलनीच्या बाजूच्या कचराकुंडीतील कचरा उचलण्यासाठी आले होते. तेथील एका कर्मचाऱ्याला सहा जिलेटीनच्या कांड्या आणि घड्याळासारखी वस्तू दिसली. प्रथमदर्शनी टाईमबॉम्बसारखी वाटणारी ती वस्तू होती. त्या सफाई कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलावून घेतलं.
पोलिसांनीही त्या संशयित वस्तूच्या बाजूला रेतीच्या गोणीचे कठडे बनवून टायरमध्ये झाकून ठेवली. संपूर्ण परिसर सील करण्यात आला. बॉम्बशोधक पथकाला पाचारणा केलं. बॉम्बशोधक पथकाने त्या संशयास्पद वस्तूची आपल्या उपकरणाद्वारे पाहणी केली. अर्धा तास बॉम्बशोधक पथक परिश्रम करत होते. श्वान पथकाच्या आधारे गावातही झाडझडती घेतली असता. ती वस्तू डमी बॉम्ब बनवून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऐन सणासुदीला अज्ञात व्यक्तींनी दहशत बसवण्यासाठी किंवा कुणीतरी खोडसालपणे हे कृत्य केले आहे का, याबाबत आता अर्नाळा पोलिस तपास करणार आहेत. अर्नाळा सागरी किनाऱ्याजवळच डमी बॉम्ब सापडला आहे. आजूबाजूला रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच, आज शनिवार असल्याने पर्यटकांचा ओढाही या रिसॉर्टकडे मोठ्या प्रमाणात होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement